India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी चेंडूचा वाद चांगलाच रंगला. भारतीय खेळाडू चेंडूच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इंग्लंडमध्ये ड्यूक्स चेंडूचा वापर केला जातो. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुबमन गिलने अनेकदा चेंडूच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि चेंडू बदलून देण्याची मागणी केली. दुसरा नवीन चेंडू १० षटकानंतर खराब झाल्याची तक्रार गिलने अंपायरकडे केली. या निर्णयानंतर इंग्लंडचे माजी कर्णधार नासीर हुसेन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

इंग्लंडचे माजी कर्णधार नासीर हुसेन यांच्या मते, गिलने चेंडू बदलून घेतल्यामुळे भारतीय संघाचं नुकसान झालं. कारण जो चेंडू देण्यात आला होता, त्या चेंडूने गोलंदाजांना स्विंग मिळत होता.

स्काय स्पोर्ट्सवर चर्चा करताना नासीर हुसेन म्हणाले, “भारतीय संघाने चेंडू बदलण्याचा निर्णय घेणं हा आश्चर्यचकित करणारा निर्णय होता. क्रिकेटमध्ये दोन कारणांमुळे चेंडू बदलला जातो. पहिलं कारण म्हणजे चेंडूचा आकार बदलला असेल आणि दुसरं कारण म्हणजे गोलंदाजांना मदत मिळत नसेल तर. असं काही दिसून येत असेल जर कर्णधार अंपायरकडे चेंडू बदलण्याची मागणी करू शकतो. पण सकाळी भारतीय संघाला जो चेंडू देण्यात आला होता, तो स्विंग होत होता आणि गोलंदाजांना मदत मिळत होती. त्यामुळे चेंडू बदलण्याची मागणी करणं मला आश्चर्यचकित करणारं होतं.”

तसेच ते पुढे म्हणाले, “ज्या चेंडूने सुरुवातीचे १० षटकं टाकले ते चेंडू स्विंग होत होते. बुमराहने दमदार गोलंदाजी केली. दुसऱ्या बाजूने सिराजही चांगली गोलंदाजी करत होता. जो चेंडू इतका फायदेशीर ठरत होता तो बदलण्याचा निर्णय का घेतला?.” असा प्रश्न नासीर हुसेन यांनी उपस्थित केला आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ गडी बाद केले. या दमदार गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाचा डाव ३८७ धावांवर आटोपला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.