मँचेस्टर : इंग्लंड आणि मँचेस्टर युनायटेडचे माजी फुटबॉलपटू सर बॉबी चाल्र्टन यांचे शनिवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. चाल्र्टन यांची इंग्लंडच्या सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंमध्ये गणना केली जाते. इंग्लंडने १९६६च्या विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते आणि या विश्वविजेतेपदाचे नायक म्हणून चाल्र्टन यांना ओळखले जाते. मध्यरक्षक असूनही चाल्र्टन यांच्या नावे ४० वर्षांहूनही अधिक काळ मँचेस्टर युनायटेड (२४९) आणि इंग्लंडसाठी (४९) सर्वाधिक गोलचा विक्रम होता. हे दोन्ही विक्रम वेन रूनीने मोडले होते. पुढे इंग्लंडसाठी सर्वाधिक गोलचा रूनीचा विक्रम सध्याच्या संघाचा कर्णधार हॅरी केनने मोडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘सर बॉबी हे केवळ मँचेस्टर किंवा इंग्लंडमधील नाही, तर जगभरातील फुटबॉलपटूंसाठी आदर्श होते. फुटबॉलपटू म्हणून त्यांची गुणवत्ता अलौकिक होतीच, पण त्यापेक्षा ते त्यांची खिलाडूवृत्ती आणि फुटबॉलची अखंडता जपण्यासाठी ओळखले जायचे. सर बॉबी हे फुटबॉल या खेळातील एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून सगळय़ांच्या स्मरणात राहतील,’’ असे मँचेस्टर युनायटेड क्लबने आपल्या निवेदनात म्हटले. चाल्र्टन यांनी युनायटेडसाठी ७५८ सामने, तर इंग्लंडसाठी १०६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यात त्यांना एकदाही लाल कार्ड मिळाले नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former footballer bobby charlton passes away amy
First published on: 22-10-2023 at 01:43 IST