Rajasthan Royals fan crying video viral : आयपीएल २०२४ च्या सुरुवातीपासून विजयाच्या रथावर स्वार असलेल्या राजस्थानचा प्रवास अंतिम फेरीपूर्वी एक सामना संपला आहे. हैदराबाद संघाने राजस्थानचा ३६ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर चेपॉक स्टेडियमचा नजारा पाहण्यासारखा होता. एकीकडे हैदराबादचे चाहते सेलिब्रेशनमध्ये तल्लीन झालेले दिसले, तर दुसरीकडे राजस्थानमधील काही चाहत्यांच्या चेहऱ्यावर निराशा तर काहींच्या डोळ्यात अश्रू तरळले. कर्णधार सॅमसनही ट्रॉफीपासून वंचित राहिल्यानंतर निराश दिसला. यादरम्यान राजस्थान रॉयल्सच्या चाहतीला अश्रू अनावर झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

राजस्थान रॉयल्सचा संघ या हंगामात अप्रतिम फॉर्ममध्ये दिसत होता. सुरुवातीला संघाने एकामागून एक विजयांची नोंद केली होती. पण प्लेऑफ्सच्या काही दिवस आधी राजस्थानची ट्रेन रुळावरून घसरली. संघाला सलग ४ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, सुरुवातीच्या कामगिरीच्या जोरावर हा संघ प्लेऑफ्ससाठी पात्र ठरला होता. एलिमिनेटर सामन्यात राजस्थानने आरसीबीचा पराभव करत क्वालिफायर-२ मध्ये स्थान मिळवले. पण जेव्हा हैदराबादने राजस्थानवर मात केली, तेव्हा एक छोटी चाहती रडताना दिसला.

स्टँडमध्ये बसून चाहतीला अश्रू अनावर झाल्याचा व्हिडीओ –

राजस्थान रॉयल्सच्या एका चाहतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. राजस्थानच्या डावाचे १९ वे षटक सुरू होते. त्यावेळी राजस्थान रॉयल्सला विजयासाठी ७ चेंडूत ४२ धावांची गरज होती. सामना राजस्थानच्या हातातून जवळपास गेला होता. अशा परिस्थितीत तिच्या टीमची अवस्था पाहून स्टँडवर बसलेली एक राजस्थानी मुलगी अश्रू ढाळू लागली. तिचा संघाच्या पराभवावर विश्वास बसत नव्हता. जिचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा – RR vs SRH IPL 2024 Qualifier : सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनंतर फायनलमध्ये, फिरकी गोलंदाज ठरले मॅचविनर

राजस्थान रॉयल्स संघाकडून गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती, परंतु संजू सॅमसन, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल यांसारख्या स्टार खेळाडूंची कचखाऊ फलंदाजी संघाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली. त्यामुळे हैदराबादच्या १७६ धावांच्या लक्ष्यापासून राजस्थानचा संघ ३६ धावा दूर राहिला. ध्रुव जुरेलने शानदार अर्धशतक झळकावले असले तरी संघाला विजयापर्यंत नेण्यात त्याला यश आले नाही. आता २६ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात फायनल सामना खेळवला जाणार आहे. हा फायनल सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे.