नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाचे वडील त्रिलोकचंद यांचे रविवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या वर्षी त्यांना कर्करोग झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर वर्षभर झुंज देऊनही रविवारी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, इरफान पठाण यांनी रैनाच्या वडिलांना आदरांजली वाहिली. ३५ वर्षीय रैना २०२०मध्ये निवृत्त झाला.