Ab Devilliers Prediction On WTC Final: विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्यांचा या स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गेल्या हंगामात ऑस्ट्रेलियाने बलाढ्य भारतीय संघाला पराभूत करत पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं होतं. ऑस्ट्रेलियाकडे दुसऱ्यांदा जेतेपदाची संधी असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिविलियर्सने विजेत्या संघाबाबत मोठी भविष्यवाणी किलो आहे.
एबी डिविलियर्सने दावा केला आहे की, दक्षिण आफ्रिकेचा संघ यावेळी मोठा उलटफेर करू शकतो. दोन्ही संघांमध्ये ११ जून ते १५ जून दरम्यान अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
दक्षिण आफ्रिका मोठा उलटफेर करणार
या सामन्याबद्दल बोलताना एबी डिविलियर्स म्हणाला, ” लॉर्ड्सच्या मैदानावर होणारा अंतिम सामना, हा दक्षिण आफ्रिका क्रिकेटसाठी खूप मोठा क्षण आहे. संपूर्ण देश आमच्या संघाच्या पाठीशी असेल. आशा करतो, यंदा आमचा संघ विजयी होईल.”
तसेच तो पुढे म्हणाला, ” दक्षिण आफ्रिकेचा हा संघ संतुलित आहे. मला पूर्ण विश्वास आहे , आम्ही ऑस्ट्रेलियाला हरवू शकतो. आम्ही यावेळी मोठा उलटफेर करू शकतो. कारण ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.”
केव्हा, कुठे आणि कधी होणार अंतिम सामना?
आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामना ११ जूनपासून सुरू होणार आहे. हा सामना ११ जून ते १५ जून दरम्यान खेळवला जाईल. तर १६ जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. हा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होईल. तर भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होईल.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेची कामगिरी (२०२३–२५)
एकूण सामने –१९
जिंकलेले सामने –१३
पराभव –४
ड्रॉ – २
विजयाची सरासरी –६७.५४ टक्के