महेंद्रसिंग धोनी हा एक भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान कर्णधारांपैकी एक आहे. एकदिवसीय आणि टी२० प्रकारात तो तीन आयसीसी चषक जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. कर्णधार म्हणून त्यांनी अनेक कठोर निर्णयही घेतले. यामुळे त्यांना लोकांच्या नजरेत खलनायक बनावे लागले. केवळ चाहतेच नाही तर त्याच्या माजी सहकाऱ्यांनीही त्याला उघडपणे फटकारले.
भारतीय संघाचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार एमएस धोनी नुकताच समाज माध्यमांवर लाईव्ह आला होता. धोनी लाईव्ह येऊन काहीतरी मोठी घोषणा करणार, असा चाहत्यांचा अंदाज होता, पण तसे काहीच झाले नाही. धोनी बिस्किट कंपणी ‘ओरिओ’ यांची जाहिरात करण्यासाठी लाईव्ह आला होता. धोनीच्या या लाईव्हनंतर भारताचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत गंभीरच्या कुत्र्याचे नाव ओरिओ असल्याचे समजते. चाहते हा व्हिडिओ पाहून वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत.
एमएस धोनी लाईव्ह येणार म्हणून चाहते आतुरतेने वाट पाहत होते. त्याने यावेळी ‘ओरिओ’ बिस्किटाची जाहिरात करताना २०११ विश्वचषकाशी संदर्भ जोडला. धोनी म्हणाला की, २०११ मध्ये ही कंपनी सुरू झाली होती आणि याच वर्षी भारताने विश्वचषक जिंकला होता. आता २०२२ मध्येही विश्वचषक खेळला जाणार आहे आणि यावर्षी कंपनी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे. धोनीच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, कंपनी भारतीय संघासाठी लकी आहे, असेच त्याला म्हणायचे होते. धोनी म्हणतो की, हे बिस्किट २०११ मध्ये भारतात आले तेव्हा टीम इंडियाने विश्वचषक जिंकला. आता पुन्हा एकदा ओरियो भारतात लाँच होत आहे, त्यामुळे या वेळेचा टी२० विश्वचषकही आपणच जिंकणार आहे.
हेही वाचा : आगामी विश्वचषकासाठी माहीचा जबरदस्त प्लॅन, २०११च्या विश्वचषकाची पुनरावृत्ती होणार
धोनीच्या लाईव्हनंतर गौतम गंभीर याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पाहून काही चाहते असा दावा करत आहेत की, गंभीरने हा व्हिडिओ धोनीला विरोध करण्यासाठीच पोट्स आहे. तर काहीच्या मते धोनी आणि गंभीरच्या व्हिडिओचा एकमेकांशी कसलाही संबंध नाहीये. व्हिडिओत गंभीर स्वतः ओरिओविषयी काहीच बोलत नाहीये. पण त्याची मुलगी त्यांच्या कुत्र्याला ओरिओ नावाने बोलवते. त्याची मुलगी एका खुर्चीवर उभा आहे आणि कुत्र्याला बोलावत आहे. व्हिडिओवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत.
धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०११ विश्वचषक जिंकला होता. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात धोनीने ९७ तर गंभीरने ९१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती आणि संघाला विश्वचषक जिंकवून दिला होता. भारतीय संघाच्या एतिहासातील हा दुसरा विश्वचषक तब्बल २८ वर्षांनंतर जिंकला होता.
एकाच वेळी धोनीची ‘ओरिओ’ जाहिरात आणि त्याचवेळी गंभीरने शेअर केलेला कुत्र्याचा फोटो यावरून सोशल मीडियात मजेदार मीम्स लोकांनी ट्विट केले आहेत.