बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात भारताने विजय तर मिळवलाच पण त्याचबरोबर संघासाठी अजून एक सकारात्मकत गोष्ट घडली. ती म्हणजे भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने या सामन्यात अर्धशतक झळकावून आपल्या टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. त्यानंतर आता भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने राहुलच्या फॉर्मवर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

याआधी झालेल्या तीन सामन्यांमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरलेल्या केएल राहुलला सूर गवसला आहे. या भारतीय सलामीवीराने ३२ चेंडूत सर्वोत्तम फटकेबाजी करत अर्धशतक झळकावून संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी दूर केली. तसेच केएल राहुलच्या पाठीमागे असलेले सर्व टीकाकार आता त्याचे कौतुक करू लागले आहेत. केएल राहुलने उच्चस्तरीय शॉट्स खेळले. राहुलच्या या कामगिरीनंतर गौतम गंभीर म्हणाला आहे की, केएल पुढील स्पर्धेत आणखी चमकेल.

स्टार-स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात गंभीर म्हणाला की, जेव्हा केएलने ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावले, तेव्हा प्रत्येकजण त्याच्याकडून खूप अपेक्षा करू लागला. यानंतर केएल चालला नाही. त्याला खूप टीकेला सामोरे जावे लागले आणि त्याच्यावर दबावही आला. गौतम म्हणाला की, मी सांगू इच्छितो की, एक वाईट खेळी एखाद्याला वाईट खेळाडू बनवत नाही, तसेच एक चांगली खेळी एखाद्याला महान खेळाडू बनवत नाही. आपण संतुलित असणे आवश्यक आहे. आता राहुलने फॉर्म पकडला आहे, मला खात्री आहे की तो येत्या सामन्यांमध्ये स्पर्धेत आणखी प्रकाश टाकेल.

हेही वाचा – ऑस्ट्रेलियाचे भवितव्य श्रीलंकेच्या हातात! ; उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडला विजय अनिवार्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौतम म्हणाला की, केएल राहुल नेहमीच फॉर्मात असतो. होय, असे काही वेळा होते, जेव्हा तुम्हाला योगदान द्यायचे असते, तुम्हाला माहित आहे की हा विश्वचषक आहे आणि संपूर्ण क्रिकेट जग तुमच्याकडे पाहत आहे. आणि जर तुम्ही चांगली सुरुवात केली नाही, तर तुम्ही वाईट खेळाडू बनत नाही. गंभीरने सांगितले की, केएल राहुल आता फॉर्ममध्ये आला आहे. तो आपला फॉर्म चालू ठेवू शकतो. केएल अधिकाधिक आक्रमक होऊ शकतो. कारण राहुलला येथून जसे खेळायचे आहे, तसे खेळण्यापासून त्याला कोणीही रोखू शकत नाही. फक्त केएल राहुल स्वतःला रोखू शकतो.