२०२२ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. टी२० क्रिकेट आणि वेगळे कर्णधारपद याबाबत चर्चा सुरू झाली आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर हार्दिक पांड्याला टीम इंडियाचा कर्णधार बनवून व्यवस्थापनानेही याचे संकेत दिले आहेत. हार्दिक ही भूमिका कायम ठेवेल की हे स्थान भरू शकेल असा दुसरा कोणी खेळाडू आहे हे येणाऱ्या काळाच ठरवेल. त्याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भविष्यवाणी करत हार्दिक पांड्यासोबत या कर्णधारपदासाठी या खेळाडूचे नाव पुढे केले आहे.

वास्तविक, गंभीरने अशा दोन भारतीय क्रिकेटपटूंची नावे दिली आहेत जे भविष्यात भारताचे नेतृत्व करू शकतात. गंभीरने दिल्लीतील FICCI कार्यक्रमात आपल्या पसंतीच्या दोन भारतीय खेळाडूंची नावे दिली आहेत (रिपोर्ट ईएसपीएन) जे भविष्यात भारताचे नेतृत्व करू शकतात. गंभीरने हार्दिक पांड्याला भारताचे भविष्य असे वर्णन केले आहे, तर माजी भारतीय क्रिकेटपटूने आणखी एक नाव घेतले आहे जे चाहत्यांनाही आश्चर्यचकित करणारे आहे.

हेही वाचा :   FIFA World Cup 2022: पोर्तुगाल आणि ब्राझीलकडे आजचा सामना जिंकून राउंड १६ पोहचण्याची संधी

हार्दिक व्यतिरिक्त गंभीरने पृथ्वी शॉचेही भावी कर्णधार म्हणून वर्णन केले आहे. शॉ बद्दल बोलताना गंभीर म्हणाला, “मला शॉ मध्ये भारताचा भावी कर्णधार बनण्याची क्षमता दिसते कारण तो एक आक्रमक खेळाडू आहे आणि तो आक्रमक कर्णधार असल्याचे सिद्ध करेल. माजी भारतीय क्रिकेटपटू पुढे म्हणाला, “मला वाटते की पृथ्वी शॉ संघाला बांधून ठेवण्यात यशस्वी ठरू शकतो. तसेच आताची पिढी ही आमच्यापेक्षा दोन पावले पुढचा विचार करते. त्यामुळे समवयस्क खेळाडूंना कसे बरोबर घेऊन जायचे याचे कोशल्य त्याने १९- वर्षाखालील क्रिकेटमध्ये विश्वचषक जिंकून दाखवून दिले.”

हेही वाचा :   ODI World Cup 2023: अफगाणिस्तान सह ‘हे’ सात संघ थेट पात्र ठरले, मोठ्या संघांना बसला धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पृथ्वी शॉ ला भावी कर्णधार म्हणून निवडल्याबद्दल गंभीर म्हणाला, “मला माहित आहे की बरेच लोक त्याच्या मैदानाबाहेरील त्याच्या कामाबाबतही लोकं खूप चर्चा करताना दिसतात. त्याला निवडायचे की नाही हे प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांचे काम आहे.” गंभीर पुढे म्हणाला, “निवडकर्त्यांचे काम केवळ १५ खेळाडू निवडणे नाही तर लोकांना योग्य मार्ग दाखवणे हे त्यांचे काम आहे. पृथ्वी शॉ एक अतिशय आक्रमक कर्णधार, खूप यशस्वी कर्णधार असू शकतो, कारण खेळाडू ज्या पद्धतीने खेळतो त्याच्यानुसार त्याच्यातील कलागुण हे बाहेरील लोकांना दिसत असतात.”