Tokyo Olympics: गोल्फर अदिती अशोकने वाढवल्या पदकाच्या आशा; जबरदस्त कामगिरीमुळे अपेक्षा उंचावल्या

गोल्फर अदिती अशोकने जबरदस्त कामगिरी करत तिसऱ्या फेरीनंतर दुसरे स्थान कायम ठेवले आहे.

aditi-ashok
गोल्फर अदिती अशोकने वाढवल्या पदकाच्या आशा

गोल्फर अदिती अशोकने जबरदस्त कामगिरी करत तिसऱ्या फेरीनंतर दुसरे स्थान कायम ठेवले आहे. त्यामुळे अदितीकडून पदकाच्या आशा वाढल्या आहेत. आज टोक्योच्या कासुमिगासेकी कंट्री क्लबमध्ये महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक प्लेची तिसरी फेरी झाली. या फेरीत अप्रतिम कामगिरी करत तिने स्पर्धेमध्ये स्वतःची जागा आणि पदकाच्या आशा कायम ठेवल्या.

अदिती आज झालेल्या सामन्यात ५ बर्डी घेऊन १२-अंडर २०१ वर दुसऱ्या स्थानावर आली. ती अमेरिकेची गोल्फर आणि जगातील पहिल्या क्रमांकाची गोल्फर नेली कोरडा हिच्या १ स्ट्रोक मागे आहे. अदितीची टी -३ वर २-स्ट्रोक आघाडी असून तिथे चार गोल्फर तिच्या बरोबरीत आहेत. ज्यामध्ये न्यूझीलंडची लिडिया को, ऑस्ट्रेलियाची हॅना ग्रीन, डेन्मार्कची एमिली क्रिस्टीन पेडरसन आणि मोने इनामी यांचा समावेश आहे.

अदितीने उत्कृष्ट खेळत पहिल्या दिवशी टॉप ३ मध्ये स्थान मिळवले होते. त्यानंतर कामगिरीत सातत्य राखत तिने स्थान टिकवून ठेवले. अदितीने शुक्रवारी पहिल्या ८ होलमध्ये ३ बर्डी नीट केल्या. परंतु शेवटच्या होलमध्ये बोगी उचलली. त्यानंतर ती १२ अंडर-पॅरसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली. अदितीने टोकियोमध्ये महिला वैयक्तिक स्ट्रोक प्ले स्पर्धेच्या तिन्ही दिवसांसाठी प्रत्येकी पहिल्या बोली लावल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Golfer aditi ashok kept second spot in round three at tokyo olympics hrc

ताज्या बातम्या