scorecardresearch

WPL 2023: डिआंड्रा डॉटिनच्या प्रश्नावर गुजरात जायंट्सने सोडले मौन; निवेदन जारी करुन सांगितले बाहेर करण्याचे कारण

Gujarat Giants Statement: गुजरात जायंट्सने डिआंड्रा डॉटिनला डब्ल्यूपीएलमधून बाहेर केल्याने वाद निर्माण झाला होता. ज्यावर फ्रँचायझीने निवेदन जारी करुन स्पष्टीकरण दिले.

WPL 2023 Gujarat Giants issued a statement a
डिआंड्रा डॉटिन (फोटो संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

WPL 2023 Gujarat Giants Updates: डब्ल्यूपीएल २०२३ स्पर्धेला ४ मार्चपासून सुरूवात झाली आहे. या सीझनला सुरुवात होण्यापूर्वीच एक वाद निर्माण झाला, तो म्हणजे वेस्ट इंडिजच्या डिआंड्रा डॉटिनबद्दल. डॉटिनचा गुजरात जायंट्सने त्यांच्या संघात समावेश केला होता, पण ३ मार्च रोजी फ्रँचायझीने तिला वगळल्याची माहिती दिली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या किम गर्थचा बदली म्हणून समावेश केल्याचीही माहिती दिली. यावरुन वाद निर्माण झाला होता. ज्यावर आता फ्रँचायझीने स्पष्टीकरण दिले आहे.

डिआंड्रा डॉटिनच्या हकालपट्टीमागे काय कारण आहे, असा प्रत्येकाच्या मनात प्रश्न होता. कारण फ्रँचायझीने त्याच्या हकालपट्टीचे कारण देखील स्पष्ट केले नव्हते. मात्र, आता रविवारी फ्रँचायझीने डॉटिनच्या हकालपट्टीचे कारण स्पष्ट केले. फ्रँचायझीने सांगितले की, कॅरेबियन खेळाडूला हंगामाच्या अंतिम मुदतीपूर्वी मेडिकल क्लियरेंस मिळाले नाही.

डॉटिनच्या हकालपट्टीवर गुजरात जायंट्सने निवेदन प्रसिद्ध केले आणि म्हटले, “डिआंड्रा ही जागतिक दर्जाची खेळाडू आहे. तसेच फ्रँचायझीसाठी एक विलक्षण करार आहे. दुर्दैवाने, आम्ही डब्ल्यूपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी आवश्यक असलेल्या या हंगामासाठी निर्धारित अंतिम मुदतीपूर्वी मेडिकल क्लियरेंस मिळवू शकलो नाही. आम्ही तिला लवकरच मैदानात परत पाहण्यासाठी उत्सुक आहोत. तिच्या मेडिकल क्लियरेंसच्या आधारे, ती आगामी हंगामात गुजरात जायंट्स संघाचा भाग असेल.”

दुसरीकडे, शनिवारी डिआंड्रा डॉटिनने तिच्या दुखापतीच्या वृत्ताचे खंडन केले. त्याचबरोबर सांगितले की, ती कोणत्याही परिस्थितीतून बरी होत नाही. या कारणास्तव चाहत्यांनी फ्रँचायझीकडे खरे कारण स्पष्ट करण्याची मागणी केली होती, जे आता समोर आले आहे.

गुजरात जायंट्सचा पहिल्याच सामन्यात पराभव –

महिला प्रीमियर लीग २०२३ चा पहिला सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरात जायंट्सचा मुंबई इंडियन्सकडून १४३ धावांनी मोठा पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत ५ बाद २०७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरात जायंट्सचा संघ १६व्या षटकात ६४ धावांवर आटोपला.

हेही वाचा – Irani Cup 2023: यशस्वी जैस्वालच्या ३५७ धावांच्या जोरावर शेष भारताने जिंकला इराणी कप; मध्य प्रदेशला २३८ धावांनी चारली धूळ

गुजरात जायंट्सचा दुसरा सामना ५ मार्च रोजी यूपी वॉरियर्सविरुद्ध होणार आहे. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजता होणार आहे. पहिल्या सामन्यादरम्यान दुखापत झालेली कर्णधार बेथ मुनी खेळणार की नाही हे पाहणे बाकी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2023 at 17:20 IST