Hardik Pandya Viral Video : टीम इंडियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियावर २-१ ने आघाडी घेत कसोटी मालिका खिशात घातली. आता दोन्ही संघ वनडे मालिकेसाठी आमनेसामने येणार आहेत. पहिल्या सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या करणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी हार्दिकने कंबर कसली आहे. सोशल मीडियावर हार्दिकचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीत हार्दिक पांड्या टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये सहभागी नव्हता. त्यामुळे सुट्टीच्या दिवसांत हार्दिकने कुटुंबियांसोबत वेळ घालवला. आता तो वनडे मालिकेच्या तयारीला लागला आहे. वनडे मालिकेच्या आधी हार्दिकचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो एक बॅट बनवताना दिसत आहे. व्हिडीओत त्याचा भाऊ कृणालही दिसत आहे. हार्दिकची मनपसंत बॅट बनवून झाल्यानंतर तो बॅटने काही फटके मारत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हार्दिक पांड्याने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही ठेवला होता.

MS Dhoni Review System as Umpire Gives Wide Ball in CSK vs LSG match IPL 2024
IPL 2024: धोनी रिव्ह्यू सिस्टीम! पंचांचा निर्णय अन् लगेचच माहीचा रिव्ह्यूसाठी इशारा, पाहा काय घडलं?
Virat-Gautham interaction video goes viral
KKR vs RCB : भाईचारा ऑन टॉप! विराट-गंभीर एकमेकांशी संवाद साधतानाचा नवीन VIDEO व्हायरल
Suresh Raina Helps Limping ms dhoni Viral Video
IPL 2024: चालताना त्रास होणाऱ्या धोनीला सुरेश रैन्नाने दिला आधार, व्हीडिओ होतोय तुफान व्हायरल
IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल

नक्की वाचा – WTC Final 2023: …म्हणून टीम इंडिया पोहोचली WTC फायनलमध्ये, हा Video पाहून तुमचीही धडधड वाढेल

इथे पाहा व्हिडीओ

दुखापतीनंतर २०२२ मध्ये हार्दिकने क्रिकेटमध्ये पुनरागमन करून नवीन फ्रॅंचायची गुजरात टायटंसला आयपीएलमध्ये जेतेपद मिळवून दिलं. त्यानंतर हार्दिकडे कर्णधार म्हणून पाहण्यास सुरुवात झाली. टी २० वर्ल्डकपनंतर हार्दिकला टी २० टीमचं नेतृत्व सोपवण्यात आलं. हार्दिकच्या नेतृत्वात टीम इंडियाने न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा दारुण पराभव केला. आता वनेड मालिकेतही नेतृत्व करण्यात हार्दिकला यश मिळतं का? हे पाहावं लागणार आहे.