Hardik Pandya pulled out of ODI series against Sri Lanka : भारतीय क्रिकेट संघ येत्या काही दिवसात श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होणार आहेय. या दौऱ्यात श्रीलंका-भारत यांच्यात टी-२० आणि वनडे मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्याला २७ जुलैपासून सुरुवात होणार आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या श्रीलंका दौऱ्यावर जाणार असल्याची मोठी बातमी आहे. तो फक्त टी-२० मालिकेत संघाचे प्रतिनिधित्व करणार असून वनडे मालिकेतून त्याने माघार घेतली आहे. याबाबत त्याने बीसीसीआय कळवल्याचे माहिती आहे. तो वनडे मालिकेत का खेळणार नाही? याबद्दल जाणून घेऊया.

हार्दिक पंड्या टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा एक सदस्य होता आणि संपूर्ण स्पर्धेत त्याने संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर हार्दिक पंड्यासह सर्व वरिष्ठ खेळाडू विश्रांती घेत आहेत. मात्र, नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना वनडे मालिकेसाठी वरिष्ठांनी परत यावे, असे वाटत असल्याचे वृत्त आहे. एकीकडे विराट कोहली लंडनमध्ये आहे तर दुसरीकडे वैयक्तिक कारणांमुळे रोहित शर्मा इंग्लंडनंतर अमेरिकेत आहे. यामुळे त्यांच्याबद्दल अद्याप कोणतेही अपडेट आलेली नाही. त्यामुळे या दौऱ्यासाठी भारतीय संघ निवडलेला नाही. तो येत्या काही दिवसात निवडला जाईल.

हार्दिक पंड्याने वनडे मालिकेतून का माघार घेतली?

हार्दिक पंड्याने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत सहभागी न होण्यासाठी वैयक्तिक कारण सांगितले आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले ही एक नाजूक बाब आहे. हार्दिकचा फिटनेस हा मोठा मुद्दा आहे, पण भारताचा आयसीसी ट्रॉफी न जिंकण्याचा दुष्काळ संपवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, वनडे मालिकेत सहभागी न होण्याचे खरे कारण हार्दिक पंड्याच सांगू शकतो. अलीकडेच तो अनंत अंबानीच्या लग्नात जोमाने डान्स करताना दिसला होता. अनन्या पांडे आणि रणवीर सिंगसह त्याने खूप डान्स केला होता.

२७ जुलैपासून टी-२० मालिकेला होणार सुरुवात –

बीसीसीआयने अधिकृत घोषणा करून ही माहिती दिली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता २७ जुलैपासून टी-२० मालिका सुरू होणार आहे. यापूर्वी २६ जुलैला म्हणजे एक दिवस आधी टी-२० मालिकेला सुरूवात होणार होती. पण आता २७ जुलैपासून सुरूवात होणार आहे. दुसरा सामना २८ जुलै ऐवजी २९ जुलै आणि तिसरा सामना २९ जुलै ऐवजी ३० जुलैला खेळवला जाईल. टी-२० मालिकेतील सर्व सामने पल्लेकेले येथील स्टेडियमवर खेळवले जातील.

हेही वाचा – Amit Mishra : विराट-गौतम यांच्यातील वाद कसा मिटला? अमित मिश्राने केला खुलासा, जाणून घ्या कोणाला दिले श्रेय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीम इंडियाचे श्रीलंका दौऱ्याचे सुधारीत वेळापत्रक –

पहिला टी-२० सामना, २७ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता (भारतीय वेळेनुसार), पल्लेकेले स्टेडियम
दुसरा २० सामना, २८ जुलै, संध्याकाळी ७ वाजता, पल्लेकेले स्टेडियम
तिसरा टी-२० सामना, ३० जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता, पल्लेकेले स्टेडियम
पहिला एकदिवसीय सामना, २ ऑगस्ट, दुपारी २.३० वाजता, कोलंबो
दुसरा एकदिवसीय सामना, ४ ऑगस्ट, दुपारी २.३० वाजता, कोलंबो
तिसरा एकदिवसीय सामना, ७ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता, कोलंबो