Harmanpreet Kaur Record: भारताच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीकत कौरने महिला क्रिकेट जगतात नाव विक्रम आपल्या नावे केला आहे. इंग्लंडविरूद्ध झालेल्या सामन्यात कर्णधार हरमनने संघाला गरज असताना महत्त्वपूर्ण खेळी केली आणि स्मृती मानधनासह संघाचा डाव सावरला. पण संघ मात्र विजयी रेषा गाठण्यात अपयशी ठरला. हरमनने ७० धावांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.

भारत मोठ्या अडचणीत असताना हरमन फलंदाजीला आली आणि तिला संघाचा डाव उचलून धरला. १० षटकांत २बाद ४२ धावा अशी स्थिती असताना हरमनप्रीत फलंदाजीला उतरली. २८८ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तिची खेळीच भारतासाठी आशेचा किरण ठरली. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागील दोन सामने गमावल्यामुळे, उपांत्य फेरीत स्थान टिकवण्यासाठी हा सामना जिंकणं भारतासाठी अत्यावश्यक होतं आणि हार्दमनप्रीतची ही खेळी त्या लढतीचं केंद्रबिंदू ठरली. पण अखेरीस निकाल मात्र संघाच्या बाजूने लागला नाही.

हरमनप्रीत कौरने महिला विश्वचषकाच्या इतिहासात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. तिने स्पर्धेत चौथ्या आणि त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत १ हजार धावांचा टप्पा पार केला आणि अशी कामगिरी करणाऱ्या ती मोजक्या खेळाडूंपैकी एक बनली.

आपल्या कारकिर्दीत पाचव्यांदा विश्वचषक खेळताना, हरमनप्रीतने आतापर्यंत ३१ सामने खेळले असून १०१७ धावा केल्या आहेत. तिची सरासरी ४६.२२ अशी प्रभावी आहे, तसेच तिने ३ शतकं आणि ५ अर्धशतकं झळकावली आहेत. हरमनप्रीत कौर महिला विश्वचषकात चौथ्या आणि त्याच्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांमध्ये एक हजार धावांचा पल्ला गाठणारी पहिली महिला फलंदाज ठरली आहे. याशिवाय महिला विश्वचषकामध्ये १ हजार धावा पूर्ण करणारी ती दुसरी भारतीय महिला फलंदाज ठरली आहे.

महिला विश्वचषक इतिहासात चौथ्या किंवा त्याखालील क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

हरमनप्रीत कौर – १०१७ धावा – भारत
नॅट स्किव्हर ब्रंट – ९९६ धावा – इंग्लंड
मिताली राज – ७०९ धावा – भारत
मारिजन काप – ५४५ धावा – दक्षिण आफ्रिका
एलिस पेरी – ५४७ धावा – ऑस्ट्रेलिया

हरमनप्रीत कौरने विश्वचषक इतिहासात ८ अर्धशतकी खेळी केल्या आहेत. यासह ती विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक ५० किंवा त्याहून अधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. विशेषत: तिसऱ्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना हरमनने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. पूर्वी या यादीत हरमनप्रीत नॅट स्किव्हर-ब्रंट आणि मिताली राज यांच्याबरोबरीत होती, पण आता तिने त्यांनाही मागे टाकलं आहे.