Harmanpreet Kaur: भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला आंतरराष्ट्रीय स्तरावर संघाने अधिकाधिक कसोटी सामने खेळवायचे आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये महिलांसाठी कसोटी क्रिकेटचे अधिक सामने खेळवले जावे, असे तिचे म्हणणे आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने महिला क्रिकेटमधील लांबलचक स्वरूपाच्या क्रिकेट फॉरमॅट भर देत अधिक कसोटी सामने खेळवले जावे अशी मागणी केली आहे.

कसोटी क्रिकेट स्वरूपातील अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामने खेळण्याची मागणी हरमनने केली आहे. जरी तिने अशी मागली केली असली तरी आगामी काळात टीम इंडिया फक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धचा कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय महिला संघ २०२२-२५ दरम्यान चालणार्‍या वर्तमान फ्यूचर टूर्स प्रोग्राम चक्रामध्ये सर्वात लांब फॉरमॅटमध्ये स्पर्धा करणार्‍या चार संघांमध्ये सर्वात कमी कसोटी सामने खेळणारा फक्त भारतीय संघ आहे. बाकी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे भारतापेक्षा अधिक कसोटी सामने खेळणार आहेत.

स्काय स्पोर्ट्स क्रिकेट पॉडकास्टवर याबाबत बोलताना हरमनप्रीत म्हणाली, “यावर्षी आमच्याकडे दोन कसोटी सामने आहेत, एक इंग्लंडविरुद्ध आणि एक ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि मला आशा आहे की या सामन्यांचा महिला क्रिकेटवर मोठा प्रभाव पडेल. मात्र, आताच्या काळात एवढेच सामने पुरेसे नाहीत त्यामुळे सामन्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.”

हेही वाचा: IND vs WI: ‘या’ कारणासाठी पांड्याला स्वार्थी म्हटले जात आहे, तिलक वर्माशी झालेला संवाद स्टंप माईकमध्ये कैद, पाहा Video

भारतीय संघाच्या कर्णधाराने तिला भविष्यात आणखी कसोटी सामने खेळायला मिळतील अशी आशा तिने व्यक्त केली होती. हरमनप्रीत म्हणाली, “आम्हाला महिला क्रिकेटमध्ये कसोटी सामने परत आणावे लागतील कारण महिला क्रिकेटसाठी ते खूप महत्त्वाचे आहे.” २०२३-२४ हंगामात भारताला मायदेशात दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. संघाने याआधी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. सध्याच्या एफटीपीमध्ये इंग्लंड सर्वाधिक पाच कसोटी सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका चार आणि तीन कसोटी खेळणार आहेत.

हरमनप्रीत पुढे म्हणाली, “मला एक खेळाडू म्हणून अधिकाधिक कसोटी सामने खेळायचे आहे कारण एक खेळाडू म्हणून तुम्ही त्यातून प्रगल्भ होत जातात. एका खेळाडूच्या नात्याने मला टेलिव्हिजनवर टी२० पेक्षा अधिक कसोटी क्रिकेट पाहायला आवडेल. आजच्या काळात खूप टी२० खेळले जात आहे. पण कसोटी क्रिकेट ही एक अशी गोष्ट आहे जिथे प्रत्येक क्रिकेटपटूचे त खेळायचे स्वप्न असते.” या धडाकेबाज फलंदाजाने सांगितले की, देशातील महिला क्रिकेटच्या दृष्टीने देशांतर्गत दृष्टीकोन सुधारत आहे, परंतु अधिक कसोटी सामने खेळण्याची गरज आहे.

भारताची महिला कर्णधार पुढे म्हणाली की, “आमच्या देशांतर्गत महिला क्रिकेटचा दर्जा खूप बदलला आहे. सुरुवातीला जेव्हा मी खेळायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला फार कमी सामने खेळायला मिळाले पण गेल्या काही वर्षांत देशांतर्गत क्रिकेट खूप खेळायला मिळत असून त्यात सुधारना झाली आहे. आम्हाला अधिक सामने खेळायला मिळतात. काही यातील सामने थेट प्रक्षेपित केले जातात जे लोक टीव्हीवर पाहू शकतात.”

हेही वाचा: Asian Champions Trophy: हॉकीमध्ये रंगणार आज भारत-पाकिस्तान महामुकाबला! हरल्यास पाक उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरमन पुढे म्हणाली, “देशांतर्गत स्तरावर सुधारणा होत आहे पण जेव्हा मी खेळायला सुरुवात केली तेव्हा दोन-तीन दिवसांचे सामने होत होते पण आता माझ्या माहितीप्रमाणे ते होत नाहीत. मला वाटते की या दोन कसोटींनंतर परिस्थिती बदलेल. जितके जास्त क्रिकेट खेळायला मिळेल तितके आमच्यासाठी चांगले आहे. कसोटी क्रिकेटमुळे महिला क्रिकेटमध्ये जितकी सुधारणा होईल तितकी भारतीय संघात आणखी काही प्रतिभा पाहायला मिळेल.”