होबार्ट : इंग्लंडविरुद्ध होबार्ट येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या प्रकाशझोतातील पाचव्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अंतिम संघातून मार्कस हॅरिसला वगळण्यात आले आहे, तर डेव्हिड वॉर्नरच्या साथीने उस्मान ख्वाजा सलामीला उतरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ख्वाजाने लक्षवेधी पुनरागमन करताना १३७ आणि नाबाद १०१ धावा काढल्यामुळे हॅरिसला संघातील स्थान टिकवता येणार नाही.

दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंडला तंदुरुस्तीआधारे स्थान देण्यात येईल, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने स्पष्ट केले. त्यामुळे बोलंडच्या जागी झाय रिचर्डसन किंवा मायकल नेसर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकेल.

*   वेळ : सकाळी ९.३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, टेन ३

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harris dropped usman khawaja to open for australia in 5th ashes test zws
First published on: 14-01-2022 at 02:42 IST