Hasin Jahan allegations on Mohammed Shami : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी नुकताच त्याची मुलगी आयराला भेटला. शमीची मुलगी आयरा तिची आई हसीन जहाँसोबत राहते. हसीन जहाँ आणि शमी यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू असून दोघेही एकमेकांपासून वेगळे राहतात. शमीने त्याची मुलगी आयरासोबतच्या भेटीचा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये आपल्या मुलीला भेटल्यानंतर शमी भावूक झाला होता. मात्र, आता हसीन जहाँने शमीवर मोठा आरोप केला आहे.

हसीन जहाँने शमीबद्दल राग व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. हसीन जहाँने शमीची आपल्या मुलीसोबतची भेट हा केवळ एक दिखावा असल्याचे म्हटले हे. हसीन जहाँने एका मुलाखतीत सांगितले की, आयराच्या पासपोर्टची मुदत संपली आहे. म्हणूनच ती त्याला भेटायला गेली होती. कारण नवीन पासपोर्टसाठी शमीची सही आवश्यक आहे, पण त्याने ती दिली नाही.

हसीन जहाँचा मोहम्मद शमीवर गंभीर आरोप –

मोहम्मद शमीबद्दल बोलताना हसीन जहाँने शमीबद्दल सांगितले की, ‘तो कधीच आयराबद्दल विचारत नाही. तो स्वतःमध्ये व्यस्त असतो. महिनाभरापूर्वी तो आयराला भेटला होता, तेव्हाही त्याने काहीही पोस्ट केले नव्हते. कदाचित यावेळी त्याच्याकडे सोशल मीडियावर शेअर करण्यासारखे काही नव्हते म्हणून त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला.’

हेही वाचा – IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या T20I मालिकेपूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल हार्दिकवर नाराज? जाणून घ्या कारण

आयराला गिटार आणि कॅमेरा हवा होता –

हसीन जहाँ पुढे म्हणाली, ‘शमीने आयराला अशा ठिकाणाहून शॉपिंग करायला लावली, जिथे तिला एक रुपयाही द्यावा लागत नाही. आयराला तो ज्या कंपनीची जाहिरात करतो, त्या कंपनीचे शूज घेऊन दिले. जेणेकरून त्याला कोणत्याही गोष्टीची पैसे द्यावे लागू नयेत. त्याचबरोबर आयराला गिटार आणि कॅमेरा हवा होता, पण शमीने ते तिला घेऊन दिले नाही.’

हेही वाचा – ‘…म्हणून धोनीपेक्षा रोहितची नेतृत्त्व शैली आवडते’, हरभजन सिंगने सांगितले कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँचा खटला कोर्टात सुरू आहे. हसीन जहाँ आणि मुलगी आयरा यांच्या पालनपोषणासाठी शमी दर महिन्याला भत्ताही देतो. शमी आणि हसीन जहाँ वेगळे राहतात आणि त्यांच्या मुलीचा ताबा सध्या हसीन जहाँकडे आहे. यामुळेच शमी वेळोवेळी आपल्या मुलीला भेटायला जातो. सध्या शमी दुखापतीतून सावरत असून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे.