Ajinkya Rahane nightmare: भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. व्हिडीओमध्ये रहाणे सोफ्यावर बसला असून त्याच्याभोवती दोन लोक नाचत आहेत. व्हिडीओखाली त्याने एक कॅप्शन देळील लिहिली आहे. रहाणेने लिहिले की, “जेव्हा दोन लोक लॉकर रूममध्ये सेलिब्रेशन करत असतात आणि तुम्ही काही कमी बोलणाऱ्या लोकांपैकी एक असता तेव्हा हे एक माझ्यासाठी दुखद स्वप्न असते.” रहाणेने कॅप्शनमध्ये लिहिले की “इंट्रोवर्ट म्हणजे कमी बोलणाऱ्या लोकांचा हा ट्रेंड एक भयानक स्वप्न आहे.”

लोकांना हा व्हिडीओ रहाणेच्या चाहत्यांना प्रचंड आवडला

अजिंक्य रहाणेने शेअर केलेल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील व्हिडीओ मध्ये तो पुढे म्हणतो की, “”अरे भाई साहब यह किस लाइन में घुस गए आप.” म्हणजेच तो स्वतःलाच म्हणतो की, “अरे भाऊ कुठे येऊन फसलो आपण कुठल्या लाईनमध्ये आलो.” रहाणे फार बोलका नाही, त्याला शांत राहून काम करायला आवडते. अजिंक्य रहाणेच्या या व्हिडीओला आतापर्यंत ६३ हजारांहून अधिक लाईक्स आणि २७९ कमेंट्स मिळाल्या आहेत. रहाणेच्या व्हिडीओवर चाहत्यांनी इमोजीसह आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माहितीसाठी की, रहाणेला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे.”

WTCची नवीन सायकल वेस्ट इंडिज दौऱ्यापासून सुरू होईल

भारतीय संघ १२ जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे, जिथे ते २ कसोटी आणि एकदिवसीय आणि टी२० मालिका खेळणार आहेत. या मालिकेद्वारे टीम इंडियाचा डब्ल्यूटीसी सायकलचा तिसरा हंगामही सुरू होणार आहे. याआधी डब्ल्यूटीसीच्या दोन मोसमात भारताने अंतिम फेरी गाठून उपविजेतेपद पटकावले आहे.

हेही वाचा: World Cup 2023: किंग कोहलीचा हा शेवटचा वर्ल्डकप आहे? यावर विराटच्या ‘खास मित्राने’ दिले उत्तर; म्हणाला, “त्याच्या जवळील संधी…”

बीसीसीआयने नवीन ड्रीम-११ केली जाहीर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या नवीन लीड स्पॉन्सरची घोषणा केली आहे. फॅन्टसी गेमिंग प्लॅटफॉर्म ड्रीम-इलेव्हन भारतीय संघाचा नवीन प्रायोजक असेल. त्यांनी बायजूची जागा घेतली. बीसीसीआयने शनिवारी ही घोषणा केली. आता भारतीय संघाच्या जर्सीवर बायजूऐवजी ड्रीम-११ लिहिलेले दिसेल. अलीकडेच Adidas भारतीय क्रिकेट संघाचा नवीन किट प्रायोजक बनला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ड्रीम-११ आणि बीसीसीआयमध्ये तीन वर्षांचा करार आहे. मात्र, या कराराची रक्कम अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या जर्सीवर ड्रीम -११ लिहिलेले दिसेल. टीम इंडियाचे नवे विश्वचषक चक्र येथून सुरू होईल. बायजूचा करार या आर्थिक वर्षात संपला होता.