IND vs PAK Asia Cup 2022 : आशिया चषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्या महामुकाबला होणार आहे. आशियातील दोन मोठे संघ आज एकमेकांसमोर उभे राहतील. या हायव्हॉलटेज सामन्यासाठी दोन्ही संघाकडून कसून सराव करण्यात आला आहे. आज संध्याकाळी ७.३० वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे.
कोणाचे पारडे जड?
भारत पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यापैकी ७ सामने भारताने तर २ सामने पाकिस्तानने जिंकले आहे. भारताच पाकिस्तानशी पहिला सामना २००७ मध्ये झाला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा बॉल आऊटमध्ये परावभव केला होता. तर शेवटचा सामना गेल्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकात झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने १० गडी राखत पराभव केला होता.
आशिया चषकात आजपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ सामने झाले आहेत. यातही भारताचे पारडे जड आहे. भारताने आतापर्यंत ८ सामने जिंकले असून ५ सामने पाकिस्तानने जिंकले आहे.
विराट कोहली पाकिस्तान विरुद्ध टी-२० सामन्यांमध्ये भारतातर्फे सर्वाधिक रन्स काढणारा खेळाडू ठरला आहे. विराटने ७७.७५ च्या सरासरीने ३११ धावा काढल्या आहेत. तर विश्वचषकात झालेल्या शेवटच्या सामन्यात विराटने अर्धशतक केले होते.