राजपाल सिंगच्या दोन गोलच्या बळावर हॉकी इंडिया लीग स्पर्धेत दिल्ली वेव्हरायडर्सने मुंबई मॅजिशिअन्सवर ५-३ अशी मात केली. दिल्लीतर्फे युवराज वाल्मिकी, आकाशदीप सिंग, रुपिंदर पाल सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. मुंबईतर्फे ग्लेन टर्नरने दोन तर भरत चिन्काराने एक गोल केला.