महिला विश्वचषक २०२२ मध्ये उपांत्य फेरीची लढत रंगतदार वळणावर आली आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात प्रत्येक संघाचे साखळी फेरीत सात सामने होणार आहेत. साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत खेळलेल्या ६ पैकी ६ सामन्यात विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं आहे. मात्र इतर तीन संघांबाबत संभ्रम कायम आहे. पाकिस्तानने वेस्ट इंडिजला पराभूत केल्याने उपांत्य फेरीची गणितं बदलली आहेत. त्याचबरोबर भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत.

कसं आहे उपांत्य फेरीचं गणित?

भारत: भारताने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात तीनमध्ये विजय, तर तीनमध्ये पराभवाचं तोंड पहिलं आहे. असं असलं तरी भारताचा रनरेट चांगला आहे. +०.७६८ असा रनरेट आहे. त्यामुळे रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीची दारं अजून खुली आहे. मात्र असं असलं तरी शेवटचा सामना दक्षिण अफ्रिकेसोबत आहे. हा सामना जिंकल्यास भारताला उपांत्य फेरीत जाणं शक्य होईल. पाकिस्तानने आपले उर्वरित दोन्ही सामने म्हणजेच इंग्लंड आणि न्यूझीलंडला चांगल्या फरकाने हरवलं. दुसरीकडे, भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यास उपांत्य गाठण्याच्या भारताच्या आशा कायम राहतील. जरी भारत दक्षिण आफ्रिकेकडून हरला आणि पाकिस्तानने दोन्ही सामने जिंकले तर चांगल्या नेट रनरेटमुळे भारत पुढे असेल आणि उपांत्य फेरी गाठू शकेल.

दक्षिण अफ्रिका: दक्षिण अफ्रिकेने आतापर्यंत पाच सामने खेळले असून ४ सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी दक्षिण अफ्रिकेला एक विजय मिळवायचा आहे. उर्वरित दोन सामने वेस्ट इंडिज आणि भारतासोबत असणार आहे.

न्यूझीलंड: न्यूझीलंडचा उपांत्य फेरीचा रस्ताही अवघड आहे. न्यूझीलंडला फक्त पाकिस्तानविरुद्ध आणखी एक सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकला तर ६ गुण होतील. पण उपांत्य फेरीत जाण्यासाठी यजमानांना मोठा विजय नोंदवावा लागेल.

Women’s World Cup: ऑस्ट्रेलियाची विजयी घोडदौड सुरुच, दक्षिण अफ्रिकेवर ५ गडी राखून विजय

इंग्लंड: इंग्लंडचे दोन सामने पाकिस्तान आणि बांगलादेश सोबत आहे. त्यांना दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीतील तिसरा संघ बनण्याची संधी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेस्ट इंडिज: वेस्ट इंडिजचा नेट रन रेट खूपच खराब आहे. जर त्यांनी शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेकडून गमावला तर त्यांच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा धुसर होतील. मात्र कॅरेबियन संघाने हा सामना जिंकला तर भारत आणि इंग्लंडसाठी पुन्हा अडचणी निर्माण होऊ शकतात.