IND vs NZ Semi Final : भारताचा फलंदाज श्रेयस अय्यर याने ६७ धावांमध्ये चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत दमदार शतक ठोकलं आहे. त्याची ही खेळी कधीही विसरता येणार नाही अशीच ठरली आहे. विराटने त्याच्या कारकिर्दीतलं ५० वं शतक पूर्ण केलं. त्यापाठोपाठ श्रेयस अय्यरने ६७ चेंडूंमध्ये आपली शतकी खेळी पूर्ण केली.

श्रेयस अय्यरने ६७ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी करत आपलं शतक पूर्ण केलं. त्यानंतर बॅट उंचावून उपस्थितांना अभिवादन केलं. १०५ धावांची महत्त्वाची खेळी करत श्रेयस अय्यर बाद झाला. मात्र त्याची ही खेळी कायमच लक्षात राहिल यात काहीच शंका नाही. श्रेयस अय्यरने ७० चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ८ षटकार खेळत १०५ धावा केल्या. अखेर मिशेलने त्याचा कॅच घेतला आणि तो बाद झाला. मात्र विश्चषकाच्या या सेमी फायनलमध्ये विराट आणि श्रेयस अय्यर यांची पार्टनरशीप कायमच स्मरणात राहिल यात शंकाच नाही.

हे पण वाचा- सचिनने सलमान खानसह सगळ्या जगाला ११ वर्षांपूर्वी सांगितलं होतं, “मला खात्री आहे विराट एक दिवस….”

२०२३चा उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. आजच्या सामन्यासाठी डेव्हिड बेकहॅम पासून ते मनोरंजन क्षेत्रातील स्टार्सपर्यंत सर्वांनी स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे.

याच मैदानावर भारताने दुसरा विश्वचषक (२०११) जिंकला होता. लाखो क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममधून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे, परंतु ही संधी फक्त काही हजार लोकांनाच मिळेल, ज्यांनी योग्य वेळी तिकीट काढले. आजच्या सामना पाहण्यसाठी बॉलीवूड स्टार्सही स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. त्यात सलमान खान, आमिर खान, रणबीर कपूर यांच्या नावांचा समावेश आहे. दुसरीकडे, माजी दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम देखील या सामन्याचे साक्षीदार असणार आहे. सचिन तेंडुलकर समवेत तो स्टेडियममध्ये बसला आहे.