भारतीय क्रिकेट संघातील युवा फलंदाज विराट कोहली अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये झळकताना दिसतो. उत्तम शरिरयष्टी आणि नवोदित चेहरा म्हणून जाहिरात कंपन्याही विराटला आपली पहिली पसंती देत आहेत. त्यामुळे यावर विराटने मी फॅशन करणारा नसून उत्तम खेळाडू असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे जाहिरातींमध्ये काम करण्याचा उलट अर्थ घेण्याचे कोणतेही कारण नाही. असे म्हटले.
तसेच दक्षिण आफ्रिका संघाबरोबर खेळण्यास अतिशय उत्सुक असल्याचेही त्याने यावेळी स्पष्ट केले. विराट म्हणाला, दोन्ही उत्तम संघ असल्यामुळे. दक्षिण आफ्रिका संघाबरोबर खेळण्यास मी उत्सुक आहे. भारतीय संघ युवा खेळाडूंनी संपन्न आहे. संघ चांगली कामगिरी करेल याचा मला विश्वास आहे. परंतु, तरीसुद्धा तितक्याच प्रयत्नांनिशी आम्हाला तयार रहावे लागेल याचीही जाणीव मला आहे असेही कोहली म्हणाला.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Oct 2013 रोजी प्रकाशित
‘मी उत्तम खेळाडू असल्याचे सिद्ध केले आहे’
भारतीय क्रिकेट संघातील युवा फलंदाज विराट कोहली अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये झळकताना दिसतो. उत्तम शरिरयष्टी आणि नवोदित चेहरा म्हणून जाहिरात

First published on: 02-10-2013 at 11:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I have proved i am not all about funky clothes virat kohli