scorecardresearch

Premium

ICC World Cup 2023: भारत आता एकटा टायगर, भूषवणार वर्ल्डकपचं यजमानपद, ‘या’ दहा शहरांमध्ये रंगणार सामन्यांचा थरार

आगामी होणाऱ्या वर्ल्डकपचे सामने भारताच्या दहा शहरांतील मैदानात रंगणार, जाणून घ्या शहरांची नावे

ICC World Cup in India
पहिल्यांदाच भूषवणार वर्ल्डकपचं यजमानपद

ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या टी20 वर्ल्डकपवर इंग्लंडच्या संघाने जेतेपदाचं नाव कोरलं. इंग्लंडने सलग दोनवेळा वर्ल्डकप जिंकण्याच्या किर्तीमान करून इतिहास रचला. पण आयसीसीच्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये भारताच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली. भारताला यावर्षी झालेल्या टी20 वर्ल्डकपच्या नॉक आऊट फेरीत पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर टीम इंडियाच्या विरोधात ट्रोलिंगचा सूर आवळला. टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंसह प्रशिक्षकांनाही नेटकऱ्यांनी धारेधर धरलं. एव्हढच नाही तर बीसीसीआयनेही आगामी होणाऱ्या स्पर्धांमध्ये टीम इंडियात बदल केले जातील, असं स्पष्ट केलं. अशातच आता आगामी होणाऱ्या मर्यादीत षटाकांतील वन डे फॉर्मेटच्या वर्ल्डकपचे संपूर्ण क्रिडा विश्वाला वेध लागले आहेत.

2023 मध्ये होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारताकडे असणार आहे. यापूर्वी भारताने शेजारील देश पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ल्डकपचं आयोजन केलं होतं. भारताने 1987,1996, आणि 2011 मध्ये वर्ल्डकपचं यजमानपद भूषवलं आहे. मात्र, पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपचं आयोजन भारत स्वत:च करणार आहे. त्यामुळे दुसऱ्या देशावर अवलंबून न राहता यावेळी खुद्द भारतानेच वर्ल्डकपचं आयोजन केलं आहे. त्यामुळे एकट्या भारताने वर्ल्डकपसाठीचं आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, भारतातील दहा शहरांमध्ये या वर्ल्डकपचे सर्व सामने खेळवले जाणार आहेत.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
ajit pawar
“माझ्याकडील अर्थखातं पुढं टिकेल, नाही टिकेल सांगता येत नाही, पण…”, अजित पवारांचं विधान
hardeep singh nijjar murder case canada allegations on india
Video: “जे अमेरिकेनं लादेनबाबत केलं, तेच भारतानं…”, कॅनडाच्या आरोपांवर माजी अधिकाऱ्याचा अमेरिकेला घरचा आहेर; म्हणे, “स्वत:लाच फसवू नये”!

आणखी वाचा – बीसीसीआय एमएस धोनीवर सोपवणार मोठी जबाबदारी! ‘या’ पदावर केले जाऊ शकते नियुक्त

‘असा’ आहे वर्ल्डकप 2023 चा संपूर्ण शेड्यूल

आयसीसीकडून वर्ल्डकपसारख्या मोठ्या टुर्नामेंटचं आयोजन 2023 मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात करण्यात येणार आहे. वर्ल्डकपचा पहिला सामना 14 ऑक्टोबर 2023 ला खेळवला जाणार आहे. तर पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्याचं आयोजन 23 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामना 24 नोव्हेंबरला खेळवण्यात येईल आणि शेवटच्या अंतिम सामन्याचा थरार 26 नोव्हेंबरला रंगणार आहे. भारताच्या दहा मोठ्या शहरांमध्ये वर्ल्डकपचे सामने खेळवले जाणार आहेत, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

या शहरांमध्ये खेळवले जाणार वर्ल्डकपचे सामने

१) इकाना स्टेडियम, लखनौ

२) ग्रीन पार्क स्टेडियम, कानपूर

३) इडेन गार्डन, कोलकाता

४) एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

५) अरूण जेटली स्टेडियम, दिल्ली

६) नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

७) राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद

८) वानखेडे स्टेडियम, मुंबई</p>

९) पीसीए स्टेडियम, मोहाली पंजाब

१०) एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरू

आणखी वाचा – PAK vs ENG : पाकिस्तानच्या पराभवानंतर नेटकऱ्यांना मिळालं नवं ‘Meme Material’; ICC ने शेअर केला Video

या मैदानात वर्ल्डकपच्या फायनलचा महामुकाबला

वर्ल्डकप 2023 च्या अंतिम सामन्याचा थरार कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानात रंगणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीय. मात्र, वर्ल्डकपचा उपांत्य फेरीतील आणि अंतिम सामना ईडन गार्डनच्या मैदानात खेळवला जाणार असल्याचं जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे. अंतिम सामन्याच्या आयोजनाच्या स्पर्धेत दिल्ली आणि मुंबईचे स्टेडियमही आहेत, यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

संपूर्ण देशभरात विस्तारलेल्या शहरांमध्ये वर्ल्डकपचे सामने खेळवले जाणार आहेत. तसंच पहिल्यांदाच उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आणि कानपूरही वर्ल्डकपच्या सामन्यांचे साक्षीदार ठरणार आहेत. अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. सर्वात जास्त प्रेक्षकांना बसण्याची आसनव्यवस्था या स्टेडियमचं खास वैशिष्ट्य आहे. या स्टेडियममधून तब्बल 1 लाख 32 हजार क्रिडा प्रेमींना क्रिकेटचा सामना पाहता येऊ शकतो. तर कोलकाताच्या ईडन गार्डन मध्ये 66 हजार प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-11-2022 at 13:19 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×