भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. या सामन्याच्या निर्णयाबद्दल बरीच चर्चा झाली होती. कोण विजेता होईल, हे निश्चित करण्यासाठी किमान तीन कसोटी सामन्यांची मालिका असायला हवी होती, असेही म्हटले जात होते. पण हा सामना ड्रॉ झाला किंवा अनिर्णित सुटला तर विजेता कोण असेल, हा प्रश्न सर्वांच्या मनात डोकावत होता. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

हा सामना ड्रॉ झाला किंवा अनिर्णित सुटला तर दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेता घोषित करण्यात येईल, असे आयसीसीने सांगितले आहे. १८ जून ते २२ जून असा हा सामना साऊथम्प्टनच्या हॅम्पशायर बाउल येथे होईल. शिवाय, २३ जूनला राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आले आहे. हे दोन्ही निर्णय २०१८मध्येच घेतले गेले होते.

 

हेही वाचा – ‘‘अश्विन ४२व्या वयापर्यंत खेळून महान गोलंदाजाला मागे टाकू शकतो”

दोन्ही संघ –

भारत – रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा.
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला

न्यूझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग (यष्टीरक्षक), विल यंग.

हेही  वाचा – ‘‘सुशीलनं देशासाठी नाव कमावलं, पण मीडिया त्याला गुन्हेगार म्हणून सादर करत आहे”