scorecardresearch

Premium

Cricket World Cup 2023 : २८७ धावा किंवा २८४ चेंडू! उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानपुढे आज इंग्लंडविरुद्ध अवघड आव्हान

चौथ्या स्थानासाठी आता केवळ न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा आहे. या स्पर्धेतही न्यूझीलंडचा संघ सध्या बराच पुढे आहे.

icc cricket world cup 2023 pakistan vs england match prediction zws
अष्टपैलू बेन स्टोक्स व बाबर आझम

कोलकाता : एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखतानाच उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला आज, शनिवारी इंग्लंडविरुद्ध २८७ धावांनी किंवा २८४ चेंडू राखून विजय अनिवार्य आहे. पाकिस्तानसाठी हे निश्चितच मोठे आव्हान ठरणार आहे.

साखळी फेरीतील एक सामना शिल्लक असताना गुणतालिकेत चौथ्या स्थानासाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस होती. यापैकी न्यूझीलंडने गुरुवारी श्रीलंकेवर सहज विजय मिळवताना उपांत्य फेरीच्या दिशेने मोठे पाऊल टाकले. या निकालानंतर अफगाणिस्तानपुढे दक्षिण आफ्रिकेला तब्बल ४३८ धावांनी पराभूत करण्याचे अशक्यप्राय आव्हान होते. मात्र, अफगाणिस्तानला यात यश आले नाही. त्यामुळे चौथ्या स्थानासाठी आता केवळ न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा आहे. या स्पर्धेतही न्यूझीलंडचा संघ सध्या बराच पुढे आहे.

England vs India match preview,
मायदेशातील वर्चस्व राखण्याची संधी! फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
Umpire stops Australia Wicket celebrations no appeal For run out Rule For Not Out AUS vs WI T20I Highlights Second Win After IND vs AUS
ऑस्ट्रेलियाचं सेलिब्रेशन पंचांनी थांबवलं; बाद असूनही ‘त्याला’ घोषित केलं नाबाद, क्रिकेटचा हा नियम काय सांगतो?
U19 World Cup 2024 Updates in marathi
U19 WC 2024 final: भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार अंतिम सामना? टीम इंडियाला मिळणार १८ वर्षांपूर्वीचा बदला घेण्याची संधी
U19 World Cup Semi Final 2024 IND vs SA Match Updates in marathi
U19 World Cup 2024 : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

हेही वाचा >>> ICC Cricket World Cup 2023 : सराव हेच ऑस्ट्रेलियाचे उद्दिष्ट; पुण्यात आज बांगलादेशशी लढत

न्यूझीलंडचे नऊ सामन्यांअंती १० गुण असून पाकिस्तानचे आठ सामन्यांत आठ गुण आहेत. त्यामुळे पाकिस्तानला विजय अनिवार्य आहे. शिवाय न्यूझीलंडची निव्वळ धावगती +०.७४३ अशी, तर पाकिस्तानची +०.०३६ अशी आहेत. आता न्यूझीलंडला मागे टाकायचे झाल्यास पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारून इंग्लंडवर २८७ धावांनी विजय मिळवावा लागेल. परंतु इंग्लंडची प्रथम फलंदाजी आल्यास, त्यांनी दिलेले आव्हान पाकिस्तानला केवळ १६ चेंडूंत पार करावे लागले. त्यामुळे सध्या तरी न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरी गाठणार असे चित्र आहे. गतविजेत्या इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले असले, तरी सातवे स्थान मिळवत २०२५च्या चॅम्पियन्स करंडकासाठी पात्रता मिळवण्याची त्यांना संधी आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेल. पाकिस्तानला विजय मिळवणे सोपे जाणार नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Icc cricket world cup 2023 pakistan vs england match prediction zws

First published on: 11-11-2023 at 03:22 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×