भारताचा मर्यादित षटकांच्या फॉरमॅटचा नवा कर्णधार रोहित शर्मा नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसीच्या वनडे क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. रोहितने संघसहकारी आणि माजी कर्णधार विराट कोहलीसोबतचे अंतर कमी केले आहे. विराट कोहली या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर कायम आहे.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने आपल्या अर्धशतकासह महत्त्वपूर्ण रेटिंग गुण मिळवले. विराट कोहलीचे ८२८ तर, रोहितचे ८०७ रेटिंग गुण आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे, तर फखर झमान आणि इंग्लंडचा फलंदाज जो रूट टॉप-१० मध्ये पोहोचला आहे.

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी

हेही वाचा – IND vs WI : अभिमान वाटावा असा क्षण..! टीम इंडियासमोर खेळतेय टीम इंडिया; पाहा PHOTO

वेस्ट इंडीजचा शाई होप टॉप-१० मधून बाहेर पडला. गोलंदाजांच्या यादीत पहिल्या १० मध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सातव्या स्थानावर कायम आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा आठव्या स्थानावर आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या वेस्ट इंडीजच्या जेसन होल्डरने अव्वल २० मध्ये स्थान मिळवले आहे.