scorecardresearch

ICC Rankings : सूर्यकुमार यादव पुन्हा चमकला; व्यंकटेश अय्यरची गरुडझेप!

विंडीजविरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा केल्या.

ICC t20 and test rankings in february 2022
व्यंकटेश अय्यर आणि सूर्यकुमार यादव

भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर या जोडीने आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. या दोन्ही फलंदाजांनी वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत चांगली कामगिरी केली, ज्याचा त्यांना क्रमवारीतही फायदा झाला आहे. भारताने नुकतीच संपलेली तीन सामन्यांची टी-२० मालिका ३-०ने जिंकली होती. भारताकडून या मालिकेत सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा केल्या तर अय्यर दुसऱ्या स्थानावर राहिला.

सूर्यकुमार यादवने आयसीसी टी-२० क्रमवारीत ३५ तर युवा फलंदाज व्यंकटेश अय्यरने २०३ गुणांची मोठी झेप घेतली आहे. सूर्यकुमार आता २१व्या तर व्यंकटेश ११५व्या क्रमांकावर पोहोचला आहे. वेस्ट इंडीजच्या निकोलस पूरननेही पाच स्थानांचा फायदा घेतला असून तो १३व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ४ षटकात ३ विकेट गमावल्या असताना यादव फलंदाजीला आला. त्यानंतर भारतीय संघाला ४५ चेंडूत ६५ धावा हव्या होत्या. यादव आणि अय्यर यांनी भागीदारी रचून संघाला ७ चेंडू राखून विजय मिळवून दिला. सूर्याने १८ चेंडूत ३४ तर व्यंकटेशने १३ चेंडूत २४ धावा केल्या आणि दोघेही नाबाद परतले. विंडीजविरुद्धच्या अंतिम टी-२० सामन्यातही या जोडीने भारताला संकटातून बाहेर काढले आणि विजय मिळवला. त्या सामन्यात सूर्यकुमार यादवने ३१ चेंडूत ६५ धावा केल्या तर व्यंकटेश अय्यर १९ चेंडूत ३५ धावा करून नाबाद राहिला. सूर्याला मालिकावीर म्हणूनही गौरविण्यात आले.

हेही वाचा – रोहितनं सांगितलं टीम इंडियाच्या भावी कर्णधाराचं नाव; म्हणाला “तो खूप हुशार…”

ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत, काइल जेमीसन प्रथमच टॉप ३ मध्ये पोहोचला आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीनंतर, जेमीसन आणि टिम साऊदी अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानावर पोहोचले. जेमीसनने कारकिर्दीतील सर्वोत्तम ८२५ रेटिंग गुण मिळवले. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाच्या अॅश्टन अगरलाही फायदा झाला आणि गोलंदाजांच्या क्रमवारीत तो टॉप-१०मध्ये पोहोचला. तो सध्या ६४५ रेटिंग गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Icc t20 and test rankings in february 2022 adn

ताज्या बातम्या