T20 World Cup IND vs ZIM Hardik Pandya: टी २० विश्वचषकात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारताचा आज झिम्बाम्बावे विरुद्ध सामना रंगला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ५ गडी गमावून १८६ धावा केल्या. १८७ च्या टार्गेटचा पाठलाग करताना झिम्बाम्बावेच्या संघाची सुरुवातच खूप खराब झाली होती. इनिंगच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीने झिम्बाम्बावेच्या सामानावीराचा झेल घेऊन त्याला तंबूत धाडले तर त्यापाठोपाठ मोहम्मद शम्मी, अर्शदीपने सुद्धा यशस्वी विकेट्स घेतल्या. ७ व्या शतकात हार्दिक पांड्याने एक कठीण विकेट घेऊन झिम्बाम्बावेच्या एर्विनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. हार्दिकची ही कॅच इतकी खास होती कि झेल घेतल्यावर पांड्याला स्वतःलाच काहीवेळ हसू आवरत नव्हते. या कमाल कॅचचा व्हिडीओ सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे.
हार्दिक पंड्याने झिम्बाम्बावेच्या विरुद्ध सहाव्या शतकात गोलंदाजी केली, यावेळी झिम्बाम्बावेचा स्टार खेळाडू आणि टी ० विश्वचषकात तीन वेळा सामनावीर ठरलेला मोहम्मद रझा व एर्विन खेळत होते. पंड्याने शतकातील ५ वा चेंडू टाकताच एर्विनने आपली बॅट फिरवून खेळायचा प्रयत्न केला पण चेंडू फार दूर जाऊच शकला नाही त्याआधीच पंड्याने एका हाताने एर्विनची कॅच झेलली. एर्विन बाद होताच काहीवेळ पांड्याला स्वतःला यावर विश्वास बसत नव्हता त्यानंतर जेव्हा रोहित शर्मा त्याच्याकडे आला तेव्हा ते दोघेही एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून हसू लागले.
अन पांड्याचा आत्मविश्वास पुन्हा दिसला
IND Vs ZIM: ऋषभ पंतला एवढ्या उशिरा का निवडलं? रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं ‘हे’ कारण
दरम्यान, आज टी २० विश्वचषकात सकाळपासूनची ही तिसरी महत्त्वाची मॅच आहे. सकाळी पार पडलेल्या नेदरलँड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात नेदरलँडने अनपेक्षितपणे बलाढ्य आफ्रिकेचा पराभव केला आहे.
दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेश विरुद्ध अगदी एकतर्फी विजय मिळवला. या दोन्ही सामन्यांमुळे आता भारत व पाकिस्तान ही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.