टी२० विश्वचषकात ग्रुप बी मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात ॲडलेडमध्ये सामना खेळला गेला. अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा बांगलादेशवर पाच धावांनी निसटता विजय मिळवला असून उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार धावांचे लक्ष हे १६ षटकात १५१ करण्यात आले होते. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टी२० विश्वचषक सुरू झाल्यापासून विराट कोहली त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध खेळताना नाबाद ६४ धावा करत खास विक्रमाची नोंद देखील केली. सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉंटिंग हे क्रिकेटविश्वातील महान फलंदाज आहेत. आता विराट या दिग्गजांच्या यादीत सहभागी झाला आहे.

विराट कोहली आणि केएल राहुल यांनी बांगलादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना दमदार अर्धशतके केली. राहुल टी२० विश्वचषकाच्या चालू हंगामात पहिल्या तीन सामन्यांमध्ये पूर्णपणे अपयशी ठरला होता. अशात बांगलादेशविरुद्धचे अर्धशतक त्याच्यासाठी अधिकच महत्वाचे ठरले. विराट कोहलीने मात्र विश्वचषक सुरू झाल्यापासून तिसरे अर्धशतक केले. विराटने पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध खेळताना नाबाद ८२ आणि ६२ धावा केल्या होत्या. अशातच आता त्याने बांगलादेशविरुद्ध ६४ धावांची नाबाद खेळी केली आणि दिग्गजांच्या यादीत सहभागी देखील झाला.

हेही वाचा :   ‘जेव्हा शाहीद आफ्रिदीने भारत सरकारमधील…’,  पाकिस्तानच्या भारत दौऱ्यावरून वेगवान गोलंदाज वकार युनिसने सांगितला किस्सा

क्रिकेटचा देव आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत. सचिनचे अनेक विक्रम असेही आहेत, जे आजही अबाधित आहेत. असाच एक विक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ५० धावांपेक्षा मोठी खेळी करण्याचा. सचिनच्या नावावर सर्वाधिक २६४ वेळा ५० धावांपेक्षा मोठी खेळी केली आहे. सचिन या यादीत पहिल्या क्रमांकावर टिकून आहे. विराट कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा मोठी खेळी करणारा पाचवा फलंदाज बनला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारे फलंदाज

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर २१७ अर्धशतकांसह रिकी पॉंटिंग आहे. तिसरा क्रमांक श्रीलंकन दिग्गज कुमार संगकाराचा आहे, ज्याने २१६ अर्धशतके केली आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलीस आहे. कॅलिसने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण २११ अर्धशतके केली आहेत. विराट कोहली ११९ अर्धशतकांसह या यादीत नव्याने सहभागी झाला आहे.

हेही वाचा :  IND vs BAN T20 World Cup 2022: विराट-राहुलची दमदार अर्धशतकं! भारताचा बांगलादेशवर पाच धावांनी विजय 

२६४ – सचिन तेंडुलकर

२१७ – रिकी पॉंटिंग

२१६ – कुमार संगकारा

२११ – जॅक कॅलिस

१९९ – विराट कोहली

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2022 virat kohlis name in the list of legendary batsmen after scoring a half century against bangladesh avw
First published on: 02-11-2022 at 18:55 IST