पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी आपल्या देशासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो त्याच्या षटकारांच्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो. पाकिस्तान क्रिकेटमधील महान क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून त्याने आधीच निवृत्ती घेतली आहे. आफ्रिदीने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पाकिस्तान क्रिकेटमधील अनेक महान खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली, ज्यात वसीम अक्रम आणि वकार युनूस यांचा समावेश आहे, जे पाकिस्तानसाठी खेळणारे महान वेगवान गोलंदाज आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, वकारने अलीकडेच आफ्रिदीशी संबंधित एक मनोरंजक किस्सा सांगितलं आहे. पाकिस्तानच्या ए स्पोर्ट्सवरील चर्चेदरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूसने सांगितले की, “शाहीद आफ्रिदीने एकदा हस्तांदोलनाच्या वेळी एका भारतीय मंत्र्याचा कसा छळ केला. त्याने सांगितले की, आफ्रिदी वयाच्या १६व्या वर्षीही खूप मजबूत क्रिकेटर होता आणि तो इतक्या जोरदारपणे हस्तांदोलन करत असे की तो अनेकदा समोरच्याचा हात जोरात दाबत असे. त्यामुळे काहीवेळेस तर इजा देखील होत असे.”

पुढे वकार बोलताना म्हणाला, “ जेव्हा आफ्रिदीने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय मंचावर पाऊल ठेवले, तेव्हा तो केवळ १५-१६ वर्षांचा होता. त्या वयातही तो खूप खंबीर आणि निश्चयी खेळाडू होता. पहिल्यांदा मी त्याच्याशी हात मिळवला तेव्हा मला जवळजवळ घाम फुटला, त्याने माझा हात खूप जोरात दाबला. कदाचित एवढे मोठे षटकार मारता आले यामागे हे एक कारण असावे.”

हेही वाचा :   IND VS BAN: के. एल राहुलचा टी २० विश्वचषकातील खेळ पाहून सुनील गावस्कर भडकले, म्हणाले, “त्याला आधी..

ए स्पोर्ट्सच्या त्या पॅनेलचा भाग असलेल्या वसीम अक्रमने माजी वेगवान गोलंदाजाच्या दृष्टिकोनाशी सहमती दर्शवली आणि म्हणाले की, “यार ये तो हाथ ही ब्रेक कर देता था यार.” दरम्यान, वकार युनूसने पाकिस्तानच्या भारत भेटीदरम्यान हस्तांदोलन करताना आफ्रिदीने भारतीय मंत्र्याचा कसा हात दाबला होता केला होता याचा खुलासा केला. पुढे बोलताना तो म्हणाला, “मला अजूनही आठवते, आम्ही भारताच्या दौऱ्यावर होतो. मला भारतीय मंत्र्याचे नाव माहित आहे पण मी त्यांचे नाव घेणार नाही. ते आम्हाला भेटायला आले आणि आमचे स्वागत केले, त्यांचे संपूर्ण शिष्टमंडळ आले होते. आम्ही सगळे एकत्र बसलो होतो. ते येताच आम्ही सर्वांनी उभे राहून त्याचे स्वागत केले. त्यांनी सर्वांना भेटून अभिवादन केले. आफ्रिदी त्यावेळी ज्युनियर होता आणि भारतीय मंत्र्याला भेटण्यासाठी तो सर्वात शेवटी उभा होता.”

हेही वाचा : World Cup: पुन्हा गंभीर v/s आफ्रिदी… यंदा कारण ठरला बाबर आझम; गंभीरच्या ‘स्वार्थी’ टीकेवर आफ्रिदी म्हणाला, “या स्पर्धेनंतर…”

वकार पुढे म्हणाला, “वयोवृद्ध मंत्री असल्याने आम्ही सर्वांनी त्यांच्याशी सौम्यपणे हस्तांदोलन केले. पण जेव्हा आफ्रिदीची पाळी आली तेव्हा मी म्हणालो हा जोरात त्यांचा हात दाबणार आणि तसेच झाले. त्याने खूप जोरात हस्तांदोलन केले. ज्यामुळे त्यांना खूप त्रास झाला होता.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When shahid afridi told the indian government fast bowler waqar younis told a story from pakistans tour of india avw
First published on: 02-11-2022 at 13:15 IST