T20 World Cup Final PAK vs ENG: मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रविवारी आयसीसी T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा सामना इंग्लंडशी होणार आहे. जागतिक स्पर्धेतील दुसऱ्या विजेतेपदावर दोन्ही संघांची नजर असेल. २००९ मध्ये पाकिस्तानने ट्रॉफी जिंकली होती, तर एका वर्षानंतर इंग्लंडने विजेतेपद पटकावले होते. आता दोन्ही संघांना बहुप्रतीक्षित विजयावर नाव कोरण्याची संधी आहे. संपूर्ण टी २० विश्वचषकात बाबर आझमच्या संघाचा प्रवास हा अगदी नाट्यमय ठरला, सुपर १२ च्या टप्प्यातून जवळपास बाद झालेला पाकिस्तान आज अंतिम फेरीत पोहोचून विजेतेपदासाठी लढणार आहे. यावरून पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज, रावळपिंडी एक्सप्रेस म्हणजेच शोएब अख्तर यांनी बाबरच्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आम्ही भारतीयांसारखे नाही असं म्हणत इंग्लंडलाही अख्तर यांनी सूचक इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अॅडलेडमध्ये अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने भारताचा १० गडी राखून पराभव केला. जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स या सलामीच्या जोडीने १७० धावांची भागीदारी करून भारतासारख्या बलाढ्य संघाला धूळ चारली. पण पाकिस्तानसमोर सामना इतका सोपा नसेल असे म्हणत अख्तर यांनी इंग्लंडला इशारा केला आहे. अख्तर म्हणतात की, ” इंग्लंड आता अतिआत्मविश्वासू या स्थितीत आहे, भारतासमोर जिंकून त्यांचा आत्मविश्वास गगनाला भिडत असेल पण पाकिस्तानचे गोलंदाज भारतासारखे नाहीत हे इंग्लंडला माहीत आहे. त्यांना जिंकण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील, त्यांना वॉकओव्हर मिळणार नाही.

पुढे अख्तर यांनी ट्विटर वर व्हिडीओ पोस्ट करत म्हंटले की, “पाकिस्तानी संघाकडे आज हरण्यासाठी काहीच नाही पण जिंकण्यासाठी सर्व काही आहे, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानचा फॉर्म दिसायला हवा न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्यांचा वाढलेला स्ट्राइक रेट संघासाठी मोठे बळ होता. तर गोलंदाजही आता उत्तम स्थितीत आहेत.”

शोएब अख्तर ट्वीट

PAK vs ENG: लहानपणी शिकवलं होतं की भारताला हरवणं हेच.. World Cup Final आधी शादाब खानने सांगितलं ध्येय

दरम्यान, पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामना आज भरतीत वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होणार आहे. मेलबर्न येथील टी २० विश्वचषकात आता भारताचे कट्टर प्रतिस्पर्धी जिंकतात की भारताला ज्यांनी त्यांचा विजय होतो हे पाहण्यासाठी काहीच तास शिल्लक आहेत

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup final pak vs eng shoaib akhtar warns england says pakistani bowlers are not like indians svs
First published on: 13-11-2022 at 09:57 IST