भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघ टी-२० चॅम्पियन ठरला आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या विजयानंतर देशातील जनतेचा आनंदालाही उधाण आलं आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरून विश्वचषक विजयाचा आनंद साजरा केला आहे.

हेही वाचा – VIDEO : विश्वचषकातील विजयानंतर पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींकडून भारतीय संघाचं अभिनंदन; म्हणाले…

नागपूरमध्ये नागरिक रस्त्यावर

विश्वचषकातील विजयानंतर नागपूरमध्ये मोठ्या संख्येने नागरिक हातात तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरले. यावेळी नागरिकांनी फटाके फोडत विजयाचा आनंद साजरा केला.

मुंबईतील विमानतळावर जल्लोष

विश्वचषक विजयाचा आनंद मुंबई विमानतळावरही बघायला मिळाला. यावेळी कर्मचाऱ्यांबरोबरच प्रवाशांनीही जल्लोष केला.

मरिन ड्राईव्हवरही क्रिकेट प्रेमींकडून जल्लोष

मुंबईतील मरिन ड्राईव्हवरही क्रिकेट प्रेमींना विजयांचा आनंद साजरा केला. विशेष म्हणजे मुंबईकर भरपावसात रस्त्यावर उतरले होते.

जम्मू-काश्मीरमध्येही विजयाचा जल्लोष

मुंबई बरोबरच जम्मू काश्मीरमध्येही भारतीय संघाच्या विजयानंतर जल्लोष बघायला मिळाला.

दिल्लीतही नागरिक रस्त्यावर

दिल्लीतही नागरिकांनीही रस्त्यावर उतरत भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी भारत माता की जय, वंदे मारतरम अशा घोषणाही देण्यात आल्या.

केरळमध्ये क्रिकेटप्रेमींकडून जल्लोष

केरळमध्येही भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने १४० कोटी भारतीयांचे स्वप्न साकारले. सामन्यातील अखेरच्या षटकात हार्दिक पंड्याने दमदार गोलंदाजी केली. तत्पूर्वी भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत आठ गडी गमावून १६९ धावा करता आल्या. या विजयासह भारताचा ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला. भारताने यापूर्वी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे.