टी-२० विश्वचषक २०२२ च्या ३५ व्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ५ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीच्या दिशेने जोरदार वाटचाल केली आहे. मात्र या सामन्यात पावसाने बांगलादेश आणि भारतीय चाहत्यांचे ठोके वाढवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. भारतासाठी विराट कोहली या सामन्याचा हिरो ठरला, त्याने ४४ चेंडूत नाबाद ६४ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीत आठ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

या सामन्यात बांगलादेशच्या पराभवानंतर शाकिब अल हसन पुन्हा एकदा निशाण्यावर आला आहे. यावेळी भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने शाकिबला त्याच्या वक्तव्यावर फटकारले आहे. या सामन्यापूर्वी शाकिबने आपण येथे विश्वचषक जिंकण्यासाठी आलो नसल्याचे विधान केले होते. तसेट बांगलादेशने भारताला हरवले तर तो एक अपसेट होईल, असे म्हणले होते.

आता भारताविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर शाकिबच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना वीरेंद्र सेहवाग क्रिकबझवर म्हणाला, ”कर्णधाराने याची जबाबदारी घेतली पाहिजे ना. त्याआधी शांतो बाद झाला, त्यानंतर शाकिबही त्याच षटकात बाद झाला. त्यामुळे तिथेच चूक झाली. ९९/३, १००/४, १०२/५, पडलेल्या त्या ३ विकेट्समध्ये एक मोठी भागीदारी झाली असती, असे नाही की तुम्हाला टी-२० मध्ये ५० धावांची भागीदारी आवश्यक आहे. १० चेंडूत २० धावांची भागीदारीही खेळाला कलाटणी देऊ शकते.”

हेही वाचा – T20 World Cup 2022 : २१ वर्षीय पाकिस्तानच्या खेळाडूने एनरिक नॉर्खियाला ठोकला जबरदस्त षटकार, पाहा व्हिडिओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बोलताना सेहवाग म्हणाला, “मला वाटतं, ही चूक होती, अगदी कर्णधाराचीही. तो कर्णधार आहे, त्याच्याकडे अनुभव आहे, जबाबदारी घ्यायला हवी होती आणि कोहली खेळतो तसा तो शेवटपर्यंत खेळायला हवा होता. अशा वेळी संघाला अडचणीतून बाहेर काढावे अन्यथा अशी थेट उलट-सुलट विधाने करू नयेत.”