बांगलादेशविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या दीपक चहरने आयसीसीच्या टी-२० क्रमवारीतही मोठी झेप घेतली आहे. आपल्या आधीच्या क्रमवारीवरून ८८ अंकानी झेप घेत दीपक चहर थेट ४२ व्या स्थानी पोहचला आहे. बांगलादेशविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात दीपकने ३.२ षटकांत ७ धावा देऊन ६ बळी घेतले होते.

अवश्य वाचा – चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटला, पंतचा पत्ता कट ! मुंबईकर श्रेयस अय्यरला पसंती

दीपकची ही कामगिरी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधली सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे. याचसोबत टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून हॅटट्रीक नोंदवणारा दीपक पहिला गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे आगामी कालखंडाच दीपक चहर आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर आणखी किती प्रगती करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – भारताच्या मालिकाविजयावर कर्णधार रोहित खुश, गोलंदाजांना दिलं श्रेय