महिला विश्वचषक २०२२ पुढील महिन्यापासून न्यूझीलंडमध्ये खेळवला जाणार आहे. करोनामुळे स्पर्धेमध्ये व्यत्यय येऊ नये, म्हणूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या अंतर्गत, जर एखाद्या संघात करोना पसरला तर तो संघ किमान ९ खेळाडूंसह मैदानात उतरू शकेल. खेळण्याच्या अटींशी संबंधित आयसीसी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ९ खेळाडूंसह सामन्यात प्रवेश करण्याचा नियम आधीपासूनच आहे. नुकत्याच वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या झालेल्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत या नियमाचा वापर करण्यात आला.

भारतीय अंडर-१९ संघातही करोनाचा शिरकाव झाला आणि अनेक सामन्यांमध्ये परिस्थिती अशी होती की, सामना खेळण्यासाठी ११ खेळाडू उरले होते. आयसीसी हेड ऑफ इव्हेंट ख्रिस टेटली यांनी गुरुवारी या बदलाची पुष्टी केली. ते म्हणाले, ”जर एखाद्या संघात करोना पसरला तर संघ ११ पेक्षा कमी खेळाडूंसह मैदानात उतरू शकतो आणि गरज पडल्यास संघ व्यवस्थापन आणि कोचिंग स्टाफमधून लोकांना प्लेइंग-११ मध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.”

shubhaman gil
ट्वेन्टी-२० विश्वचषक महत्त्वाचाच, पण तूर्तास ‘आयपीएल’वर लक्ष केंद्रित! गिलचे वक्तव्य
Ekta Day Ranveer Singh wins gold medal in steeplechase sport news
एकता डे , रणवीर सिंहला स्टीपलचेसमध्ये सुवर्ण
Candidates winner D Gukesh reaction that Viswanathan Anand sir guidance is valuable
विशी सरांचे मार्गदर्शन मोलाचे! ‘कँडिडेट्स’ विजेत्या गुकेशची प्रतिक्रिया; मायदेशात जंगी स्वागत
Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore Match Highlights in Marathi
SRH vs RCB : आरसीबीने सलग सहा पराभवानंतर नोंदवला दुसरा विजय, हैदराबादवर ३५ धावांनी केली मात

हेही वाचा – दारू, जुगार आणि तंबाखूचं सचिन तेंडुलकर करतोय समर्थन? वाचा काय म्हणाला क्रिकेटचा देव

टेटली पुढे म्हणाले, “जर आवश्यक असेल तर आम्ही एका संघाला ९ खेळाडूंना मैदानात उतरवण्याची परवानगी देऊ. आणि जर संघात व्यवस्थापन आणि कोचिंग स्टाफमध्ये महिला सदस्य असतील तर ते पर्याय म्हणून मैदानात उतरू शकतील. मात्र, दोन्ही खेळाडूंना गोलंदाजी किंवा फलंदाजी करता येणार नाही.”

करोना महामारी लक्षात घेऊन, सर्व संघांना राखीव म्हणून संघासोबत ३ अतिरिक्त खेळाडू आणण्यास मान्यता देण्यात आली आहे. संघात करोनाची प्रकरणे आढळल्यास राखीव खेळाडूंना १५ जणांच्या मुख्य संघात स्थान मिळू शकते. मात्र, गरज भासल्यास सामन्याचे वेळापत्रक बदलण्याचा पर्यायही असेल. न्यूझीलंडमध्ये सध्या करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत.

महिला विश्वचषक २०२२ची सुरुवात यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील ४ मार्च रोजी होणाऱ्या सामन्याने होणार आहे. हा सामना माऊंट मौनगानुई येथे होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना ६ मार्च रोजी पाकिस्तानविरुद्ध टॉरंगा येथे खेळणार आहे.