IND vs AFG 2nd T20 Match, Aakash Chopra on Rohit Sharma: माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने रविवारी, १४ जानेवारी रोजी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात रोहित शर्माच्या खराब फलंदाजीबद्दल टीका केली. भारताला १७३ धावांचे आव्हान दिल्यानंतर रोहितने सुरुवातीपासूनच गोलंदाजांचा सामना करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सपशेल अपयशी ठरला. रोहित लेग साइडला मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याला फझलहक फारुकीने त्रिफळाचीत केले.

“रोहित ज्या प्रकारे बाद झाला ते पाहून कोणालाही मोठा धक्का बसेल. माझ्यासाठी हा शॉट अतिशय आश्चर्यकारक होता. तो सामन्यातील त्याचा पहिलाच चेंडू खेळत होता. पहिल्याच चेंडूवर असा शॉट तो कधीही खेळत नाही. त्याच्या डोक्यात काय विचार होता, हे अजूनही कळत नाहीये. मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू थेट स्टंपवर आदळला आणि तो त्रिफळाचीत झाला. गेल्या सामन्यात तो धावबाद झाला. दोन्ही सामन्यात तो शून्यावर बाद झाला. त्याने आतापर्यंत या मालिकेत एकही धाव काढलेली नाही. यातून त्याच्यावर कुठला दबाव आहे का, याचे उत्तर त्याने द्यायला हवे,” असे आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितले.

yuvraj singh
“टी-२० विश्वचषकात ‘हा’ खेळाडू करू शकतो माझ्या सहा षटकाराच्या विक्रमाची बरोबरी”; युवराज सिंगने सांगितलं खेळाडूचं नाव
Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य

हेही वाचा: IND vs AFG: अक्षर पटेलने टी-२० मध्ये २०० विकेट्सचा गाठला टप्पा; म्हणाला, “मी हा विक्रम विसरून…”

माजी सलामीवीर आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, “इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि टी-२० विश्वचषक समोर असताना, रोहितला लवकरात लवकर त्याची भूमिका शोधण्याची गरज आहे. मात्र, रोहितने आपला आक्रमणाचा दृष्टीकोन बदलावा अशी अपेक्षा मी करत नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात धावबाद ही त्याची चूक नव्हती पण या सामन्यात शॉटची निवड नक्कीच त्याची चूक होती. रोहित शर्माच्या फॉर्म आणि क्षमतेबद्दल शंका नाही. मात्र, त्याला आयपीएलमध्ये फॉर्ममध्ये राहावे लागेल आणि मला वाटते की तो अशीच फलंदाजी करेल. भारतीय संघाला त्याने एकदिवसीय विश्वचषकात जशी आक्रमक फलंदाजी केली तशीच त्याने इथे करावी. ३८-४० धावा त्याने संघाला झटपट करून चांगली सुरुवात द्यावी. जर असे तो करू शकला तर टीम इंडियाचे काम अधिक सोपे होईल.”

भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत घेतली २०ने अभेद्य आघाडी

सामन्याबद्दल जर बोलायचे झाले तर भारतीय कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत सर्व गडी गमावून १७२ धावा केल्या. गुलबदिन नायबने सर्वाधिक ५७ धावा केल्या. ३५ चेंडूंच्या खेळीत त्याने पाच चौकार आणि चार षटकार मारले. त्याचवेळी नजीबुल्ला झादरान २१ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. करीम जनातने १० चेंडूत २० धावा करून बाद झाला. त्याचवेळी मुजीब-उर-रहमानने नऊ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २१ धावांची शानदार खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन विकेट्स घेतल्या. तर रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शिवम दुबेला एक विकेट मिळाली.

हेही वाचा: IND vs AFG: भारताच्या विक्रमी विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा खूश; म्हणाला, “१५० टी-२० सामने होणे हा प्रवास…”

भारताचा डाव

प्रत्युत्तरात भारताने १५.४ षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. रोहित सलग दुसऱ्या टी-२०मध्ये खातेही न उघडता बाद झाला. त्याचवेळी १४ महिन्यांनंतर टी-२०मध्ये पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीने १६ चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने २९ धावांची खेळी केली. शिवम दुबेसह यशस्वी जैस्वालने तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. यशस्वीने ३४ चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ६८ धावांची तुफानी खेळी केली. जितेशला खाते उघडता आले नाही. त्याचवेळी दुबेने ३२ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६३ धावा केल्या, तो ९ नाबाद राहिला. रिंकू ९ धावा करून नाबाद राहिला. अफगाणिस्तानकडून करीम जनातने दोन गडी बाद केले. तर फजलहक फारुकी आणि नवीन-उल-हक यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.