IND vs AFG, World Cup 2023: विश्वचषकाचा दहावा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात खेळला जात आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी चाहत्यांना पुन्हा विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यातील आयपीएलमधील वादाची आठवण झाली. हा सामना कोहलीच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे, त्यामुळे चाहते नवीन उल हकला मैदानात चिडवताना दिसले. सामना सुरू होण्यापूर्वी नवीन-उल-हक आपल्या संघातील खेळाडूंसोबत सराव करत असताना चाहत्यांनी कोहली-कोहलीच्या घोषणाबाजी सुरू केली. नवीन-उल-हकला चिडवण्यासाठी चाहते जाणूनबुजून कोहली-कोहलीच्या घोषणा देत होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याआधीही चाहत्यांनी नवीनउल-हकलासमोर कोहली-कोहलीच्या घोषणा दिल्या

आयपीएलदरम्यान विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यातील वादाच्या खूप चर्चेत गेल्या काही महिन्यात घडल्या आहेत. दोघांमधील भांडणाची बातमी आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या लढतीपासून दोघेही कधी आमनेसामने येणार याची चाहत्यांना प्रतीक्षा होती. याआधीही अफगाणिस्तान विश्वचषकातील पहिला सामना खेळत असताना चाहत्यांनी कोहली-कोहलीच्या घोषणा दिल्या होत्या. दरम्यान, आज पुन्हा एकदा सामन्यादरम्यान त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. नवीन-उल-हक मैदानावर सराव करत असल्याचे पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याला चिडवण्यास सुरुवात केली. कोहली-कोहलीच्या घोषणांनी संपूर्ण अरुण जेटली स्टेडियम दुमदुमले.

कोहलीच्या घरी सामना

वर्ल्ड कप २०२३चा दहावा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत भारतीय संघ पुन्हा एकदा पाठलाग करताना दिसणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. अशा परिस्थितीत कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यातील लढतीबाबत चाहते काही प्रतिक्रिया देतील हे आधीच अपेक्षित होते.

हेही वाचा: IND vs AFG: किंग कोहलीने सामन्यादरम्यान लगावले ठुमके! विराटच्या डान्सचा Video सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अफगाणिस्तानने २७२ धावा केल्या

अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना आठ गडी गमावून २७२ धावा केल्या. अफगाणिस्तानने भारताविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने सर्वाधिक ८० धावांचे योगदान दिले. तर अजमतुल्ला उमरझाईने ६२ धावा केल्या. या दोघांशिवाय अफगाणिस्तानच्या इतर अनेक फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण कोणीही मोठी खेळी करू शकले नाही. २२ धावा करणारा इब्राहिम झद्रान संघाचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्याला दोन, शार्दुल आणि कुलदीपला प्रत्येकी एक विकेट मिळाली. या सामन्यात सिराज चांगलाच महागात पडला. त्याने नऊ षटकात एकही विकेट न घेता ७६ धावा केल्या.