India vs Afghanistan 3rd T20 Match: तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघ अफगाणिस्तानवर २-०ने आघाडीवर आहे. आता टीम इंडियाच्या नजरा मालिकेतील शेवटच्या आणि तिसऱ्या सामन्यावर लागल्या आहेत. भारताला हा सामना जिंकून आपली विजयी घोडदौड कायम राखायची असून मालिकेत क्लीन स्वीप करायचा आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानला या सामन्यात पुनरागमन करून शेवट गोड करत मायदेशी परतायचे आहे. दोन्ही संघांना बंगळुरूमध्ये आपण विजय मिळवू अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

संजू सॅमसन संघात परत येऊ शकतो

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संजू सॅमसनचाही टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, दोन्ही सामन्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनचा अद्याप समावेश झालेला नाही. त्याच्या जागी दुसरा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माला दोन सामन्यांमध्ये संधी देण्यात आली. आता जितेश शर्माला विश्रांती देऊन तिसऱ्या सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनचा समावेश होण्याची शक्यता आहे.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना १७ जानेवारी रोजी होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता एम.चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे खेळतील. भारताने याआधीच मालिका काबीज केली आहे, आता तिसरा टी-२० सामना जिंकून मालिका क्लीन स्वीप करण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य आहे. चाहत्यांना हा सामना कधी, कुठे आणि कसा विनामूल्य पाहता येईल ते जाणून घेऊ या.

हेही वाचा: Ranji Trophy: मुंबईच्या सामन्यानंतर अजिंक्य रहाणेचे सूचक विधान; म्हणाला, “भारतासाठी १०० कसोटी खेळणे…”

लाइव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स-१८च्या विविध चॅनेलवर केले जाईल. लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अ‍ॅपवर उपलब्ध असेल.

अफगाणिस्तान भारताविरुद्ध कधीही जिंकू शकला नाही

भारत आणि अफगाणिस्तानचे संघ आतापर्यंत ७ वेळा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात आमनेसामने आले आहेत. अफगाणिस्तानने भारताविरुद्ध येथे एकदाही विजय मिळवलेला नाही. अफगाण संघाला ६ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. अशा परिस्थितीत पुढील टी-२० मध्येही टीम इंडियाचा वरचष्मा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

हेही वाचा: ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : ओसाका पहिल्याच फेरीत गारद, गार्सियाकडून पराभूत; पुरुषांमध्ये मेदवेदेव, त्सित्सिपास विजयी

दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग११

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल, जितेश शर्मा/संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, रवी किश्नोई, मुकेश कुमार, वॉशिंग्टन सुंदर.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अफगाणिस्तान: इब्राहिम झादरान (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), करीम जनात, नजीबुल्ला झादरान, मोहम्मद नबी, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी, मुजीब-उर-रहमान, गुलबदिन नायब, रहमत शाह.