Virat Kohli LBW Dismissal: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताचा दिग्गज कसोटी फलंदाज विराट कोहलीवर अंपायर आणि थर्ड अंपायर यांनी अक्षरशः त्याची विकेट ढापली. ऑस्ट्रेलियन खेळाडू नेहमीच ज्यावेळेस पराभव होत असतो त्यावेळेस नेहमीच रडीचा डाव खेळतात. आजही त्यांनी नितीन मेनन यांच्यावर दबाव टाकत त्यांना हाताशी धरत विराट कोहलीची विकेट ढापण्यात यशस्वी झाले. या सामन्यात कोहलीवर अन्याय झाला असे कॉमेंट्रीमधून माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीर याला वाटले.

१३५ धावांवर भारताची सहावी विकेट पडली. विराट कोहली ८४ चेंडूत ४४ धावा करून बाद झाला आहे. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. कुहमानने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. अंपायरने कोहलीला बाद दिले, पण त्याने रिव्ह्यू घेतला. चेंडू एकाच वेळी बॅट आणि पॅडला लागल्याचे रिव्ह्यूमध्ये दिसून आले, पण अंपायरने त्याला बाद घोषित केले. हा निर्णय वादग्रस्त ठरू शकतो. त्यात महत्वाची बाब म्हणजे एका बाजूने कोहली तंबू ठोकून फलंदाजी करत होता. जर ऑस्ट्रेलियाच्या विजयात जर कोणता अडसर होता तर कोहलीचा म्हणून त्यांनी अंपायरवर दबाव टाकून त्याला पायचीत देण्यास भाग पाडले. त्यात स्पष्ट दिसत होते की बॅटला लागला होता. त्यामुळे ही विकेट अंपायरने ढापली अशी चाहते सोशल मीडियावर भावना व्यक्त करत आहेत. यावर राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा देखील नाखुश पाहायला मिळाले. ड्रेसिंग रूम मधून देखील त्यांनी नाराजी व्यक्त करत थर्ड अंपायरवर राग व्यक्त केला.

विराट कोहलीने केला नवीन विक्रम

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने शनिवारी दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक विशेष कामगिरी केली आहे. त्याने मैदानात येताच दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात खास शतक झळकावले. वास्तविक, कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक डाव खेळणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने कांगारूंविरुद्ध १०० डावांचा टप्पा पार केला आहे. त्याच्या आधी केवळ महान फलंदाज सचिन तेंडुलकरने हे शतक गाठले होते.

सचिनने आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४४ आंतरराष्ट्रीय डाव खेळले. या यादीत सचिननंतर कोहली (१००डाव) पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या यादीत संयुक्त तिसर्‍या स्थानावर आहेत, त्यांनी ९६-९६ डाव खेळले आहेत. कृपया सांगा की ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक धावा करणारा सचिन हा भारतीय क्रिकेटर आहे. त्याने कांगारूंसमोर ३९ सामन्यांत ५५.०० च्या सरासरीने ३६३० धावा केल्या.

हेही वाचा: IND vs AUS: “अरे हिंदी समझ आया उसको…”, अश्विनला हिंदीत सल्ला द्यायला गेला अन् live सामन्यात विराटचा झाला पचका!  Video व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्ली कसोटीत भारतीय संघ अडचणीत

पहिल्या दिवसअखेर बिनबाद २१ वरून पुढे खेळ सुरु करताना भारताची सुरुवात खराब झाली ५० धावांच्या आता राहुल आणि रोहित तंबूत परतले. त्यानंतर एका पाठोपाठ गडी बाद होत गेले. सध्या भारताच्या १२५ वर ५ अशी बिकट अवस्था असून संघाची मदार ही विराट कोहलीवर असणार असे वाटत होते मात्र तो देखील बाद झाल्याने किमान २०० धावा तरी होतील का अशी बिकट परिस्थिती झाली आहे. भारताने ७ विकेट्स गमावून १५० धावा केल्या आहेत. अश्विन आणि अक्षर पटेल खेळपट्टीवर आहेत. फलंदाजीसाठी सक्षम असलेली ही भारताची शेवटची जोडी आहे. यानंतर फक्त शमी आणि सिराज राहिले आहेत त्यामुळे या दोघांवरचं मोठी भागीदारी करून भारताला ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येच्या जवळ घेऊन जावे लागेल.