रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दिल्ली कसोटीही जिंकली आहे. टीम इंडियाने (IND vs AUS) सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला. अशा प्रकारे भारताने ४ सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेत २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली पहिल्यांदाच स्टम्पिंग बाद झाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीचा विदेशी फिरकी गोलंदाजांविरुद्ध खराब फॉर्म कायम आहे. पहिल्या डावात तो काहीशा सुरेख लयीत दिसला, पण दुसऱ्या डावात तो पुन्हा युवा गोलंदाजाचा बळी पडला. त्याला ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू टॉड मर्फीने चकवा देत बाद केले. बाद होण्यापूर्वी विराट कोहलीने आणखी एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

वास्तविक, ११५ धावांचे छोटे लक्ष्य गाठण्यासाठी कोहलीला वेगवान खेळायचे होते. त्यामुळे दोन शानदार फटकेही मारले होते. १९व्या षटकातही तो असाच शानदार फटकेबाजी करत पुढे जाणार होता. त्यासाठी तो चार पावले पुढेही गेला. पण मर्फीने त्याची चाल ओळखून चेंडू त्याच्यापासून दूर फेकला. यानंतर कोहली खेळपट्टीच्या मधोमध अडकला आणि यष्टिरक्षकाने त्याला यष्टिचित केले. यासह कोहलीचा डाव २० धावांवर संपला.
विराट कोहली दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ८वी धाव घेताच, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २५ हजार धावा करणारा ठरला. विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने ५७७ डावात ही कामगिरी केली होती, तर आता विराट कोहलीने ५४९व्या डावात ही कामगिरी केली.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग या प्रकरणात तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने ५८८ डावांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५००० धावा पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारा विराट कोहली जगातील सहावा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, रिकी पाँटिंग, महेला जयवर्धने आणि जॅक कॅलिस यांनी २५ हजार किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया संघाचा डाव जडेजा-आश्विनने अवघ्या ११३ धावांवर गुंडाळला. त्यामुळे भारतीय संघाला विजयसाठी ११५ धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात टीम इंडियाने २६.४ षटकांत ४ बाद ११८ धावा करताना विजयावर शिक्कामोर्तब केला. त्याचबरोबर भारतीय संघाने मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे.

हेही वाचा – IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला विश्वविक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे, तर या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने सर्वबाद २६३ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये उस्माने ख्वाजाने सर्वाधिक ८१ धावांचे योगदान दिले होते. त्याचबरोबर भारताकडून मोहम्मद शम्मीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. भारतीय संघाने प्रत्युत्तरात पहिल्या डावात सर्वबाद २६२ धावा केल्या. ज्यामध्ये अक्षर पटेलने सर्वाधिक ७४ धावा केल्या. तसेच ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.