भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 अद्याप सुरूही झालेली नाही, परंतु त्यापूर्वीच खेळपट्टीवरून वाद सुरू झाला आहे. या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारीपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि त्यांच्या मीडिया तोंड बंद केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात जेव्हाही कसोटी मालिका खेळली जाते, तेव्हा खेळपट्टीबाबत चर्चा चांगलीच सुरू होते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन देश आहेत. जे फिरकी खेळपट्ट्यांबाबत सर्वाधिक तक्रार करतात. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी ऑस्ट्रेलियन मीडिया आणि माजी क्रिकेटपटू खेळपट्टीवर रडत असल्याची तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

गावसकर यांनी मिड-डे मधील त्यांच्या स्तंभात लिहिले की, ”ऑस्ट्रेलियाने माइंडगेम्स खेळण्यास सुरुवात केली असून खेळपट्टीबद्दल वाद घालण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दौऱ्यात आम्ही कोणत्या प्रकारच्या खेळपट्ट्या बनवल्या होत्या, त्याबद्दल ते बोलले. ब्रिस्बेनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना ऑस्ट्रेलियाने दोन दिवसांत संपवला.”

हेही वाचा – Border Gavaskar Trophy: कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाचे फोटोशूट; रोहित, विराटसह सर्व खेळाडू दिसले जोशात, पाहा VIDEO

गावसकर पुढे म्हणाले, ”इथे मुद्दा फक्त दोन दिवसात सामना संपला त्याचा नाही, तर कोणत्या प्रकारची खेळपट्टी तयार केली गेली हा आहे. चेंडू ज्या प्रकारे इकडे-तिकडे उसळी घेत होते. ते खेळाडूंच्या जीवासाठी आणि अवयवांसाठी धोकादायक होते. दुसरीकडे, फिरकी खेळपट्ट्यांवर केवळ फलंदाजाची प्रतिष्ठा पणाला लागते, खेळाडूंच्या जीवाला आणि अवयवांची नाही.”

हेही वाचा – Turkey Earthquake: धक्कादायक…! टर्कीचा गोलकीपर अहमत इयुप तुर्कस्लानचा मृत्यू

गावसरांनी पुढे लिहिले, ”ब्रिस्बेनमध्ये दोन दिवसात संपलेल्या कसोटी सामन्याने दोन्ही संघातील सर्वोत्तम फलंदाजांचीही मनं हरवल्याचे दिसून आले. तेव्हा ऑस्ट्रेलियन मीडियातील काही लोक म्हणाले की, हा फलंदाजांचा खेळ आहे, त्यामुळे अशा खेळपट्ट्यांवर गोलंदाजांना काही संधी मिळतात. मग तसे असेल तर उपखंडातील खेळपट्ट्यांवर गडबड कशाला? फिरकी खेळणे कोणत्याही फलंदाजासाठी अग्नी परीक्षेपेक्षा कमी नाही. कारण ते त्याच्या फूटवर्कची चाचणी घेते. म्हणूनच उपखंडात शतके ठोकणारे किंवा मोठी धावसंख्या करणाऱ्या फलंदाजांना महान फलंदाज मानले जाते.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus at least the pitches here are not life threatening sunil gavaskar pinched australia vbm
First published on: 08-02-2023 at 17:33 IST