भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात अनुभवी क्रिकेटपटू विराट कोहलीने शतक झळकावले. कोहलीने १२०५ दिवसांनी कसोटीत शतक केले. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध त्याने शेवटचा तीन आकडा गाठला. विराटचे चाहते खूप दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत होते. त्याच्या शतकानंतर जगातील अनेक माजी क्रिकेटपटू, तज्ञ आणि चाहत्यांनी ट्विट केले. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी एक ट्विट केले आहे जे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

दिल्ली पोलिसांच्या अधिकृत ट्विटरनेही एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिले होते, “प्रिय गुजरात पोलिस, कृपया पाहुण्या संघाला दुखावल्याबद्दल आमचा दिल्लीचा मुलगा विराट कोहलीवर गुन्हा दाखल करू नका. AUS-Some match.” दिल्ली पोलिसांनी ट्विटसह कोहलीचा एक फोटो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये लिहिले आहे, “बुरा ना मानो कोहली है.”

कोहलीचे कसोटीतील दुसरे संथ शतक

विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील हे दुसरे सर्वात संथ शतक आहे. या शतकासाठी त्याने २४१ चेंडूंचा सामना केला. कोहलीचे सर्वात संथ शतक २०१२ मध्ये नागपूरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध झाले होते. त्या सामन्यात त्याने आपल्या शतकासाठी २८९ चेंडूंचा सामना केला.

विराटच्या नेतृत्वाखाली भारताने खेळले आयसीसी स्पर्धांचे दोन अंतिम सामने

धोनीनंतर भारताला विराट कोहली याच्या रूपात कर्णधार मिळाला. भारताने विराटच्या नेतृत्वाखाली २०१७ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला. या सामन्यात पाकिस्तानने भारताला तब्बल १८० धावांच्या फरकाने पराभूत करत विजय मिळवला. त्यानंतर विराटच्या नेतृत्वाखाली भारताने २०२१ सालच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (WTC) अंतिम सामना खेळला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला ८ विकेट्सने पराभूत करत ट्रॉफी आपल्या नावावर केली.

हेही वाचा: IND vs AUS:  ‘एक तेरा एक मेरा…’, अश्विन-जडेजाने एकत्र पुरस्कार घेत असा साजरा केला अक्षय कुमारचा फिल्मी डायलॉग, पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय घडलं मॅचमध्ये?

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उस्मान ख्वाजाच्या १८० आणि कॅमेरून ग्रीनच्या ११४ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने शुबमन गिलच्या १२८, विराट कोहलीच्या १८६ आणि अक्षर पटेलच्या ७९ धावांच्या जोरावर ५७१ धावा केल्या. नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. पहिल्या डावाच्या जोरावर भारताला ९१ धावांची आघाडी मिळाली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता तीन धावा केल्या.