भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे तीनही सामने तीन दिवसांत संपत असून ते अधिक रंजक होत आहेत या केलेल्या विधानाशी हरभजन सिंग सहमत नाही. रोहित शर्माच्या मते, “त्याला निकाल हवा आहे आणि सामना अनिर्णित होताना पाहायचा नाही. अशा खेळपट्ट्यांवर फलंदाजांनी खेळण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, असेही रोहित शर्मा म्हणाला.” दुसरीकडे, खेळपट्ट्या अशा नसाव्यात, की सामना अडीच दिवसांत संपेल आणि गोलंदाजांना अजिबात काम करावे लागणार नाही, असे हरभजन सिंगने त्याच्या अगदी विरुद्ध मत मांडले आहे.

इंदोरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला वाईट पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघ फिरकीने रचलेल्या आपल्याच जाळ्यात अडकला आणि अवघ्या अडीच दिवसात सामना गमावला. ऑस्ट्रेलिया संघाने १९व्या षटकात एक विकेट गमावून मालिकेतील पहिला विजय मिळवला आणि विजयासाठी ७६ धावांचे लक्ष्य ठेवले.

हेही वाचा: IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव! अ‍ॅश अण्णाची भीती अन् लाबुशेनने खेळला माइंड गेम, पाहा Video

रोहितच्या मताशी हरभजन सिंगने दाखवली असहमती

सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेसाठी आला आणि यादरम्यान त्याला सामने तीन दिवसांत संपणार असल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. प्रत्युत्तरादाखल तो म्हणाला, “आम्हाला सामना अनिर्णित राहायचा नाही आणि लोकांना तो कंटाळवाणा वाटतो. आम्हाला निकाल हवे आहेत आणि फलंदाजांनीही अशा खेळपट्ट्यांवर खेळण्यासाठी कठोर परिश्रम करावेत.”

दुसरीकडे रोहित शर्माच्या या वक्तव्याबाबत हरभजन सिंगला विचारले असता तो म्हणाला, “रोहित शर्माला निकाल हवा आहे हे चांगले आहे पण सामन्याचा निकाल अडीच दिवसात येऊ नये. खेळ पाचव्या दिवसापर्यंत चालला पाहिजे. अशी खेळपट्टी असावी जिथे गोलंदाजांना विकेट घेण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. येथे गोलंदाज फार मेहनत घेत नव्हते. सगळी मेहनत फलंदाजांनी का करावी, गोलंदाजांनाही थोडी मेहनत करू द्या.”

हेही वाचा: IND vs AUS: “सारखे काय पिचवर बोलता, बोलण्यासारखे…”, सामन्यानंतर टीकाकारांना रोहित शर्माने फटकारले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजयाचे खाते उघडले आहे. खरं तर या मालिकेतील तिन्ही सामने तीन दिवसांच्या आतच संपले. यावर भारतीय कर्णधार रोहित शर्माने विधान केले ज्याला भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने असमहती दर्शवली आहे. अशा खेळपट्ट्यांवर फलंदाजांनी खेळण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, असेही रोहित शर्मा म्हणाला. “दुसरीकडे, खेळपट्ट्या अशा नसाव्यात, की सामना अडीच दिवसांतच संपेल आणि गोलंदाजांना अजिबात काम करावे लागणार नाही, असे हरभजन सिंगने म्हटले आहे.”