भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील इंदोर कसोटीचा निकाल शुक्रवारी (३ मार्च) लागला. भारतीय संघाला भारतात येऊन कसोटी सामन्यात पराभूत करणे कोणत्याही संघासाठी सोपी राहिली नाहीये. मात्र, ऑस्ट्रेलियाने इंदोर कसोटीत तब्बल ९ विकेट्स राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवानंतर हा मायदेशातील कसोटीत भारताचा मागच्या १० वर्षातील केवळ तिसरा पराभव आहे. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी इंदोरमधील तिसर्‍या कसोटीत रोहित शर्माच्या संघाचा दारूण पराभवावर केल्याची टीका केली आहे. हा पराभव अतिआत्मविश्वासामुळे झाल्याचेही सांगितले.

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी इंदोरमधील तिसर्‍या कसोटीत भारताच्या पराभावर टीका केली आहे. अतिआत्मविश्वासामुळे हा पराभव झाल्याचेही त्यांनी सांगितले. कसोटीच्या पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या सत्रात सात गडी गमावले. मॅथ्यू कुहनमनने शानदार गोलंदाजी करत पहिले पाच बळी घेतले कारण भारत पहिल्या डावात १०९ धावांवर आटोपला होता.

टीम इंडियाला अतिआत्मविश्वास नडला

सामन्यादरम्यान भाष्य करताना शास्त्री म्हणाले, “थोडीशी आत्मसंतुष्टता, थोडासा अतिआत्मविश्वास हे असेच यामागे कारण असू शकते. जिथे तुम्ही गोष्टी गृहीत धरता तिथे हा खेळ तुम्हाला खाली आणतो.” ते पुढे म्हणाले, “मला वाटते की जेव्हा तुम्ही खरोखर पहिल्या डावात व्यवस्थित विचार करून फलंदाजी केली असती तर हा पराभव तुमच्या वाट्याला आला नसता, भारताच्या फलंदाजांनी खेळलेले काही शॉट्स पहा, यात फक्त अतिउत्साह दिसतो आणि या परिस्थितीत विरोधी संघावर आक्रमक होऊनच वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करता येतो असे नाही. जे मागील दोन कसोटीत ऑस्ट्रेलियाने केले त्याचेच प्रतिबिंबित आपण टीम इंडियाच्या खेळत पहिले.”

हेही वाचा: IND vs AUS: “भारतीय गोलंदाज मेहनत नसून मजुरी…” हरभजन सिंगची रोहित शर्मावर सडकून टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने फलंदाजी क्रमात काही बदल केले, शुबमन गिलसाठी केएल राहुलला वगळण्यात आले तर उमेश यादवला मोहम्मद शमीच्या जागी संघात स्थान देण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने इंदोरमध्ये भारताने केलेल्या बदलांवर भाष्य करताना म्हणाला की, “संघातील बदल या गोष्टी संघाला अस्थिर करू शकतात. केएल राहुलला वगळण्यात आले किंवा इतर कोणाला यापैकी काही गोष्टी थोड्या अस्थिर करू शकतात, खेळाडू त्यांच्या स्थानासाठी खेळत असतात आणि संधी जर दुसऱ्या खेळाडूला दिली तर एक वेगळी मानसिकता तयार होते आणि त्याचा संघावर विपरीत परिणाम होतो. ट्रॅव्हिस हेडबद्दल असे म्हणता येईल. पहिल्या कसोटीतून तो वगळला गेला. पण ऑस्ट्रेलियन लोक ज्यासाठी ओळखले जातात त्यात तो खरा उतरला आणि त्याने चांगली कामगिरी केली पण परिस्थितीत अजूनही सुधारणे करणे गरजेचे आहे.