IND vs AUS Jasprit Bumrah and Pat Cummins create new record : भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया २२ नोव्हेंबरला पर्थमध्ये बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ चा पहिला सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ७.५० वाजता सुरू होईल. या सामन्यात पॅट कमिन्स आणि जसप्रीत बुमराह यांच्यात नाणेफेक होताच क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम होणार आहे. जे कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात पाच वेळा घडले आहे.

वास्तविक, भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माशिवाय पहिल्या कसोटी सामन्यात उतरणार आहे. रोहित शर्मा सध्या भारतात असून कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. अशा स्थितीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पर्थमध्ये टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. जसप्रीत बुमराह उद्या सकाळी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्ससोबत पर्थ कसोटीत नाणेफेकीसाठी मैदानात उतरेल, तेव्हा मैदानावर एक विलक्षण दृश्य दिसेल. या सामन्यात बुमराह आणि कमिन्स मिळून कसोटीत एक अनोखा विक्रम नोंदवतील.

कसोटी क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम होणार –

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात वेगवान गोलंदाजांनी कसोटी सामन्यात दोन्ही संघांचे नेतृत्व केल्याचे क्वचितच घडले आहे. आता पुन्हा एकदा पर्थमधील कसोटीत घडणार आहे, जेव्हा दोन्ही संघांचे कर्णधार वेगवान गोलंदाज असतील. जसप्रीत बुमराह आणि पॅट कमिन्स हे दोघेही वेगवान गोलंदाज आहेत. कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत असे फक्त पाचवेळा घडले आहे, जेव्हा कसोटी सामन्यातील दोन्ही कर्णधार वेगवान गोलंदाज होते. आता कमिन्स आणि बुमराह सहावी जोडी ठरणार आहेत.

हेही वाचा – IND vs AUS : हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी पर्थ कसोटीत पदार्पण करणार? जाणून घ्या त्यांचा आतापर्यंतचा प्रवास?

u

आतापर्यंत जसप्रीत बुमराहने केवळ एका कसोटी सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, तर पॅट कमिन्सने २८ सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. २०२२ मध्ये इंग्लंडमध्ये घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात बुमराहने टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर पॅट कमिन्सने २८ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. या कालावधीत ऑस्ट्रेलियाने १७ सामने जिंकले असून ६ सामने गमावले आहेत. त्याचबरोबर ५ सामने अनिर्णित राहिले आहेत.

हेही वाचा – Border Gavaskar Trophy Live Streaming: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने भारतात लाईव्ह कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकाच कसोटी सामन्यात दोन्ही संघांचे नेतृत्व करणारे वेगवान गोलंदाज –

बॉब विलिस (इंग्लंड) विरुद्ध इम्रान खान (पाकिस्तान), १९८२ (बर्मिंगहॅम)
वसीम अक्रम (पाकिस्तान) विरुद्ध कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडीज), १९९७ (पेशावर)
हीथ स्ट्रीक (झिम्बाब्वे) विरुद्ध शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका), २००१ (बुलावायो)
जेसन होल्डर (वेस्ट इंडीज) विरुद्ध सुरंगा लकमल (श्रीलंका), २०१८ (ब्रिजटाऊन)
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध टिम साउदी (न्यूझीलंड), २०२४ (ख्रिस्टचर्च)