India vs Australia, WTC 2023 Final: भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू हरभजन सिंग आणि एस. श्रीशांत हे सध्या लंडनमध्ये आहेत. हे दोघेही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी कॉमेंट्री पॅनलचा भाग होते. WTC फायनलमध्ये टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. फायनलमधील पराभवाचे दु:ख विसरून हरभजन सिंग आणि श्रीशांत लंडनच्या रस्त्यावर देशी शैलीत मस्ती करताना दिसले, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरसल हरभजन सिंगने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याच्यासोबत श्रीशांतही आहे. या व्हिडिओमध्ये एक कलाकार व्हायोलिनवर बॉलिवूड गाण्याची धून वाजवत आहे. ही धून शाहरुखच्या ‘कल हो ना हो’ चित्रपटातील आहे. हरभजन सिंग आणि श्रीशांत देखील शाहरुखच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये त्याच गाण्याच्या ट्यूनवर पोज देताना दिसले. हरभजन सिंग आणि श्रीशांतचा हा धमाल व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे.

खेळाडू हरभजनच्या व्हिडिओवर त्याची पत्नी गीताने बसेराने भन्नाट कमेंट केलीये. ती म्हणाली की, “ तुझी शॉपिंग बॅग जमिनीवर पडलीये विसरू नको.” व्हिडिओमध्ये सुरूवातीला भज्जीच्या हातात शॉपिंग बॅग दिसतीये. मात्र, शाहरुख खानची सिग्नेचर स्टाईल देताना त्याच्या हातातून बॅग खाली पडतीये. या लहानश्या गोष्टीवर तिच लक्ष गेलं. गीताच्या या मजेशीर कमेंटमुळे अनेकांना हसू देखील आवरलं नाही.

काही वर्षांपूर्वी हरभजन सिंगने श्रीशांतला मारली होती कानाखाली चापट

हरभजन सिंग क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा शांत असल्याचे दिसले आहे, परंतु एकदा असे घडले की जेव्हा तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही. २००८च्या आयपीएलमध्येही असंच काहीसं घडलं होतं. आयपीएलचा हा पहिलाच हंगाम होता. हरभजन सिंग मुंबई इंडियन्सचा सदस्य होता.  या हंगामात श्रीशांत किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत होता. याच सीझनमध्ये मुंबई आणि पंजाब यांच्यातील मॅचदरम्यान हरभजन सिंग आणि श्रीशांत यांच्यात काहीतरी खटकलं.

हेही वाचा: Lionel Messi: चीनने स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला तब्बल अर्धा तास ठेवले ताटकळत, नेमके काय आहे कारण? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यादरम्यान हरभजनला आपला राग अनावर झाला आणि त्याने श्रीशांतला सणसणीत कानाखाली मारली. या घटनेनंतर मोठा गदारोळ झाला. हरभजन आणि श्रीशांत यांच्यात बराच वेळ चर्चा झाली नाही. मात्र, नंतर हरभजनने आपल्या कृत्याचा पश्चाताप करत माफी मागितली. तेव्हापासून हरभजन सिंग आणि श्रीशांत दोघेही चांगले मित्र बनले आहेत. आयपीएल २०२३ मध्येही दोघांमध्ये बरीच मजा मस्ती पाहायला मिळाली होती आणि आता लंडनच्या रस्त्यावर त्यांचा हा डान्स चाहत्यांना खूप आवडतो.