scorecardresearch

Premium

IND vs AUS 2nd ODI: जबरदस्त पुनरागमन! श्रेयस अय्यरचा शॉन अ‍ॅबॉटने पकडला अप्रतिम झेल अन् अंपायरने दिले नॉटआऊट; पाहा Video

India vs Australia 2nd ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी करताना आपले शतक पूर्ण केले आहे. दुखापतीतून परतल्यानंतर अय्यर गेल्या काही काळापासून धावा काढण्यासाठी झगडत होता. दरम्यान त्याच्या कॅचवर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु आहे.

A stunning comeback Shreyas Iyer's amazing catch by Shaun Abbott and the umpire gives not out Watch the video
श्रेयस अय्यरचा शॉन अ‍ॅबॉटने अप्रतिम झेल पकडला आणि त्यानंतर अंपायरने त्याला नाबाद असल्याचा निर्णय दिला. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)

India vs Australia 2nd ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रेयसने उत्कृष्ट शतक झळकावले. दुखापतीतून परतल्यानंतर अय्यरची ही सर्वात शानदार खेळी आहे. अय्यरने आपले शतक पूर्ण करण्यासाठी ८६ चेंडूंचा सामना केला ज्यामध्ये त्याने ३ षटकार आणि १० चौकारही लगावले. विश्वचषकापूर्वी अय्यरने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाला नक्कीच दिलासा मिळाला असेल. दरम्यान श्रेयस अय्यरचा शॉन अ‍ॅबॉटने अप्रतिम झेल पकडला आणि त्यानंतर अंपायरने त्याला नाबाद असल्याचा निर्णय दिला, त्याची सध्या यावर सोशल मीडियात खूप चर्चा सुरु आहे.

श्रेयस अय्यरचे शानदार शतक

भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरही फॉर्ममध्ये परतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ८६ चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरे आणि एकूण चौथे शतक होते. वन डे व्यतिरिक्त श्रेयसने कसोटीतही शतक झळकावले आहे. मार्चमध्ये पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस क्रिकेटपासून दूर होता. यानंतर त्याने नुकतेच आशिया चषक स्पर्धेत पुनरागमन केले, मात्र दोन सामने खेळल्यानंतर त्याला पुन्हा दुखापत झाली. मात्र, आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आणि या मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला विशेष काही करता आले नाही. आता शतक झळकावून श्रेयसने विश्वचषकातून विरोधी संघांना इशारा दिला आहे. त्याचवेळी संघ व्यवस्थापनाने देखील त्याच्या शतकामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. श्रेयसचाही विश्वचषक संघात समावेश आहे.

IND vs ENG 1st Test Match Updates in marathi
IND vs ENG 1st Test : “द्रविडने शुबमनबरोबर…”, गिलच्या खराब कामगिरीनंतर केविन पीटरसनने दिला महत्त्वाचा सल्ला
Pope and Bumrah Controversy in Ind vs ENG 1st Test Match
IND vs ENG : जसप्रीत बुमराहने ऑली पोपशी मुद्दाम पंगा घेतल्याने रोहितला करावी लागली मध्यस्थी, VIDEO होतोय व्हायरल
Video of umpire in Sindh Premier League goes viral
SPL 2024 : अंपायरने अपील न होताच फलंदाजाला केले बाद घोषित, पाकिस्तानमधील सामन्यातील VIDEO होतोय व्हायरल
Kevin Sinclair cartwheel
क्रिकेटच्या मैदानावर कोलांटउड्या सेलिब्रेशन व्हायरल; वेस्ट इंडिजच्या केव्हिन सिनक्लेअरची धमाल

श्रेयसला मिळालेल्या जीवनदानाचा लाभ घेता आला नाही

३१व्या षटकात प्रचंड नाट्य पाहायला मिळाले. खरे तर या षटकात शॉन अ‍ॅबॉट गोलंदाजी करत होता. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर अ‍ॅबॉटने श्रेयसला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. यानंतर श्रेयस पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, ऑनफिल्ड अंपायर या झेलवर पूर्णपणे समाधानी दिसत नव्हते आणि त्यांनी हा निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवले. थर्ड अंपायरने रिव्ह्यूमध्ये पाहिले की कॅच घेताना अ‍ॅबॉट पूर्ण नियंत्रणात नव्हता आणि चेंडूही जमिनीवर आदळला होता. अशा स्थितीत श्रेयसला पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात बोलवण्यात आले.

हेही वाचा: Rahul Dravid’s son: वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत ज्युनिअर द्रविडची शानदार कामगिरी, अंडर-१९ संघात झाली निवड

श्रेयसला एकप्रकारे जीवनदान मिळाले आणि तिसऱ्या अंपायरने त्याला नॉट आऊटचा निर्णय दिला. श्रेयस परतला आणि पुढच्याच चेंडूवर चौकार मारला. मात्र, त्याला जीवनाच्या लीजचा फायदा घेता आला नाही आणि त्याने पुढच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात पुन्हा त्याची विकेट गमावली. यावेळी अ‍ॅबॉटच्या चेंडूवर श्रेयस मॅथ्यू शॉर्टकरवी झेलबाद झाला. श्रेयसने ९० चेंडूंत ११ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने १०५ धावांची खेळी केली. श्रेयसने शुबमनसोबत दुसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs aus king of middle order returned in form before the world cup shreyas iyer played by scoring a century avw

First published on: 24-09-2023 at 17:51 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×