Rahul Dravid’s son: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड २०२३च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकापूर्वी चर्चेत आले आहेत. २०११च्या क्रिकेट विश्वचषकानंतर भारताने ही स्पर्धा जिंकलेली नाही. एम.एस. धोनी हा आयसीसी ट्रॉफी जिंकणारा शेवटचा भारतीय कर्णधार आहे, त्याने २०११मध्ये विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. २००७ मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया बांगलादेशकडून हरल्यानंतर एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडली होती. यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या मात्र, मागील दशकात भारताने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. राहुल द्रविडला प्रशिक्षक म्हणून आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. एक खेळाडू म्हणून तो हे करू शकला नाही, पण प्रशिक्षक म्हणून आयसीसी ट्रॉफी जिंकू शकतो. क्रिकेट विश्वचषकापूर्वी द्रविड कुटुंबाला एक मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. आगामी विनू मांकड ट्रॉफीसाठी कर्नाटकच्या १५ सदस्यीय संघात द्रविडचा मुलगा समित याची निवड करण्यात आली आहे. ही १९ वर्षांखालील क्रिकेटची ही स्पर्धा १२ ते २० ऑक्टोबर दरम्यान हैदराबाद येथे होणार आहे. हेही वाचा: IND W vs BAN W: एशियन गेम्समध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने पदक केले निश्चित, उपांत्य फेरीत आठ विकेट्सने बांगलादेशला चारली धूळ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाबाबत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली आहे, कारण २०२३ च्या क्रिकेट विश्वचषकासाठी त्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या ताजेतवाने ठेवण्याचे संघ व्यवस्थापनाचे प्रयत्न होते. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना जिंकला आहे. आता दुसरा सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाचा मालिका जिंकण्याचा प्रयत्न असेल. ही मालिका दोन्ही संघांना विश्वचषकाच्या तयारीसाठी शेवटची संधी आहे. या मालिकेपूर्वी द्रविड म्हणाला होता, "ही त्या मालिकेपैकी एक आहे जिथे तुम्ही आमच्या काही खेळाडूंना पहिले दोन सामने खेळताना पाहू शकणार नाही. आम्ही आमच्या वेगवान गोलंदाजांना एक-एक करून विश्रांती देऊ. जसे इतर काही संघ खेळाडूंना विश्रांती देत आहेत तसे आम्ही करू. त्यामुळे बाकीच्या खेळाडूंना तीन सामने खेळण्याची संधी देत आहोत.” हेही वाचा: World Cup 2023: विश्वचषकाच्या तिकिटांमुळे के.एल. राहुलची चिंता वाढली; म्हणाला, “मी कोणालाच उत्तर देणार नाही…” द्रविड पुढे म्हणाला की, “मला वाटते की रोहित आणि विराट सारख्या वरिष्ठ खेळाडूंनी त्यांना हवे असलेल्या शारीरिक आणि मानसिक स्थितीत विश्वचषकात खेळणे हे भारतासाठी महत्त्वाचे आहे. त्यांनी जितके क्रिकेट खेळले आहे तितकेच ते विश्वचषकातही खेळतील. या मोठ्या खेळांसाठी स्वत:ला कसे तयार करायचे हे त्यांना माहीत आहे. यातील अनेक निर्णयांवर त्यांच्याशी चर्चा केली जाते. आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो की त्यांना मोठ्या कार्यक्रमांची तयारी कशी करायची आहे? यानंतरचं चर्चेच्या आधारे आम्ही पुढे निर्णय घेतो."