IND vs AUS Sourav Ganguly statement on Rohit Sharma : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ पूर्णपणे तयार आहे. या मालिकेची सुरुवात २२ नोव्हेंबरपासून पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्याने होणार आहे. रोहित शर्मा या सामन्यात खेळू शकणार नाही, असे अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे, कारण त्याला त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर काही वेळ कुटुंबासोबत घालवायचा आहे. मात्र, या बातमीदरम्यान भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सध्याच्या कर्णधारा रोहित शर्माबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे.

रेव्हस्पोर्ट्सच्या मुलाखतीदरम्यान सौरव गांगुली म्हणाला की, त्याला आशा आहे की रोहित शर्मा लवकरच ऑस्ट्रेलियाला जाईल, कारण संघाला नेतृत्वाची गरज आहे. रोहितसाठी ही मोठी मालिका आहे, कारण यानंतर तो कधीच ऑस्ट्रेलियाला जाणार नाही. गांगुली म्हणाला, ‘मला आशा आहे की रोहित शर्मा लवकरच ऑस्ट्रेलियाला जाईल. मला माहित आहे, त्याची पत्नी रितीकाने त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. पण संघाला सध्या त्याच्या नेतृत्वाची खूप गरज आहे. पहिल्या कसोटीला अजून आठवडा बाकी आहे. त्याच्या जागी मी असतो, तर पहिली कसोटी खेळलो असतो. कारण ही एक मोठी मालिका असून यानंतर रोहित पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियाला जाणार नाही.’ कारण डब्ल्यूटीसी फायनलनंतर निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.

रोहित पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता –

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थमधील पहिल्या कसोटीला मुकणार आहे, कारण तो त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर कुटुंबासोबत काही वेळ घालवण्यासाठी मुंबईत राहणार आहे. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाला जाईल आणि दुसऱ्या कसोटीपासून निवडीसाठी उपलब्ध असेल. एका सूत्राने सांगितले की, ‘होय, रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळणार नाही. त्याला त्याचे कुटुंब आणि नवजात बाळासोबत आणखी काही वेळ घालवायचा आहे आणि भारतीय क्रिकेट बोर्ड त्याच्या निर्णयाचा पूर्ण आदर करतो.’

हेही वाचा – Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत

u

खरंतर रोहितने शनिवारी दुपारी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये फक्त तारीख लिहिली आहे. तर त्यासोबत ग्राफिक्स असलेला फोटो आहे. त्यावर लिहिले होते, ‘कुटुंब, आता आम्ही चार आहोत.’ रोहित शर्मा दुसऱ्यांदा वडील झाला आहे. रोहितची पत्नी रितिका सजदेहने शुक्रवारी मुलाला जन्म दिला. रोहितला एक मुलगीही आहे. तिचे नाव समायरा. मुलाच्या जन्मानंतर रोहितने पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने एक ग्राफिक इमेज शेअर केली आहे. चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनीही रोहितला त्याच्या पोस्टवर शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – Champions Trophy : भारतापुढे पाकिस्तानने घेतलं नमतं, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नव्या टूरमधून POK वगळलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहितच्या अनुपस्थितीत कोण करणार नेतृत्व?

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व करेल. तो या मालिकेसाठी संघाचा उपकर्णधार नियुक्त करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही पुष्टी केली की, जर रोहित शर्मा खेळू शकला नाही तर बुमराह संघाचे नेतृत्व करेल.