India Australia 1st T20 Match Timing: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. नुकतीच ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली गेली. ऑस्ट्रेलियाने ही मालिका २-१ च्या फरकाने आपल्या नावे केली. नवा वनडे कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखाली भारताला वनडे मालिका पराभव पत्करावा लागला. यानंतर आता ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार किती वाजता होणार, जाणून घेऊया.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली. रोहित शर्माने १२१ धावांची तर विराट कोहलीने ७५ धावांची खेळी करत तब्बल १६८ धावांची उत्कृष्ट भागीदारी रचली. रोहित शर्माला अखेरच्या सामन्याचा सामनावीर आणि मालिकावीर घोषित करण्यात आलं. रोहित-विराटनंतर आता सूर्यकुमार यादवच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील.

टी-२० मालिकेसाठीचा संघही वेगळा असेल, वेगळा कर्णधार असेल. भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली पाच सामन्यांची मालिका खेळेल. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका महत्त्वाची मानली जाऊ शकते. ऑस्ट्रेलिया त्यांच्या घरच्या मैदानाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल, तर भारत विश्वविजेता संघ म्हणून मैदानात उतरेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेचे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १.४५ वाजता खेळवले जातील. तर दुपारी १.१५ वाजता नाणेफेक होईल. पहिला सामना कॅनबेरामध्ये, दुसरा सामना मेलबर्न, तिसरा सामना होबार्ट, चौथा सामना गोल्ड कोस्ट, तर चौथा सामना ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. या सामन्यांमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.

IND vs AUS T20 Schedule: भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचे वेळापत्रक

भारत वि. ऑस्ट्रेलिया पहिला टी-२० सामना – २९ ऑक्टोबर – कॅनबेरा
भारत वि. ऑस्ट्रेलिया दुसरा टी-२० सामना – ३१ ऑक्टोबर – मेलबर्न
भारत वि. ऑस्ट्रेलिया तिसरा टी-२० सामना – २ नोव्हेंबर – होबार्ट
भारत वि. ऑस्ट्रेलिया चौथा टी-२० सामना – ६ नोव्हेंबर – गोल्ड कोस्ट
भारत वि. ऑस्ट्रेलिया पाचवा टी-२० सामना – ८ नोव्हेंबर – ब्रिस्बेन

India Squad for IND vs AUS T20 Series: ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर